scorecardresearch

७१ खोल्या, स्विमिंग पूल, स्पा अन्…; राजस्थानमधील ५०० वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये स्मृती इराणी करणार लेकीचं लग्न

स्मृती इराणी यांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा, ‘या’ ठिकाणी होणार लग्न

Smriti Irani Smriti Irani daughter
स्मृती इराणी यांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा, 'या' ठिकाणी होणार लग्न

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या त्यांच्या कामामुळे कायमच चर्चेत आता. आता राजकीय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या स्मृती इराणी यांनी याआधी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका तर प्रचंड गाजली. सध्या स्मृती इराणी त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत.

आणखी वाचा – “सुपरस्टार झाल्यानंतर नातं जपलं नाही आणि कुणालाही…” सलमान खानच्या वडिलांचा अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठा खुलासा

शनैल इराणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. शनेलचं लग्न आणि त्याचदरम्यानचे कार्यक्रम ७ ते ९ फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत. यासाठी स्मृती इराणी अगदी जोरदार तयारी करत आहेत. लेकीच्या लग्नासाठी त्यांनी खास डेस्टिनेशन निवडलं आहे. ‘आजतक’च्या वृत्तानुसार स्मृती इराणी राजस्थान येथील खींवसर फोर्ट येथे लेकीचं लग्न करणार आहेत.

२०२१मध्ये शनेलचा अर्जुन भल्लाबरोबर साखरपुडा पार पडला. खींवसर फोर्टमध्येच अर्जुनने शनैलला लग्नाची मागणी घातली होती. आता याच ठिकाणी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान येथील नागौर जिल्ह्यामध्ये खींवसर किल्ला आहे. ५०० वर्ष जुना हा किल्ला आहे. जोधपूर व नागौरच्या मध्यभागी हा किल्ला आहे.

आणखी वाचा – Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

या फोर्टमध्ये जवळपास ७१ खोल्या आहेत. तसेच या किल्ल्यामध्ये ४ रेस्टॉरंटही आहेत. १८ ऐसपैस टेन्ट या किल्ल्यामध्ये बांधण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर स्विमिंग पूल, जिम, स्पाही इथे उपलब्ध आहे. म्हणजेच अगदी शाही पद्धतीने स्मृती इराणींच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं दिसत आहे. शनैल ही वकील आहे. तिने मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून लॉ ची पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी लॉ सेंटरमधून एलएलएम पदवी पूर्ण केली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 12:15 IST