बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याने ट्विटरला रामराम केल्यापासून चर्चेत आला आहे. सध्या ट्विटरवर त्याच्या नावाची चर्चा सुरु आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण हा शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे स्मृती इराणी या प्रसिद्धीझोतात आल्या. यात त्यांनी ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती.

स्मृती इराणी यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सोपा नव्हता. विशेष म्हणजे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत स्मृती इराणी यांना साईन करण्याबद्दल एकता कपूरच्या टीमने विरोध केला होता. कॉफी विथ करण या कार्यक्रमात त्यांनी याबद्दल खुलासा केला होता. २००५ मध्ये स्मृती इराणी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी स्मृती इराणी या एक आदर्श सून म्हणून प्रसिद्ध होत्या. या कार्यक्रमादरम्यान स्मृती इराणी यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले होते.
आणखी वाचा : “मॅडम, वजन कमी करण्यासाठी टीप्स द्या”, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकजण थक्क

Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?
Dilip Ghosh comments on Mamata TMC
दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव

मला ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या कार्यक्रमाचे दिवस आजही आठवतात. या कार्यक्रमाची निर्माती एकता कपूर यांच्या संपूर्ण टीमचा माझ्या कास्टिंगला पूर्णपणे विरोध होता. केवळ एकता कपूर हिने एकटीने माझ्या कास्टिंगला संमती दर्शवली होती. मला अजूनही ते दिवस आठवतात. मी त्यावेळी जिन्स, टी-शर्ट, झोलासारखी बॅग, डोळ्यावर चष्मा आणि पुस्तकं घेऊन एकता कपूरच्या ऑफिसमध्ये गेली होती. त्यावेळी एकता ही माझ्याकडे बघत म्हणाली ठिक आहे. यानंतर एकताच्या टीमने तिला माझ्याबद्दल सांगण्यास सुरुवात केले.

“तू वेडी आहेस का? या मुलीला अभिनयाबद्दल काहीही माहिती नाही काहीच माहिती नाही. तिचे स्क्रिप्ट वाचन आपण ऐकलेले नाही. तिलाच काहीच येत नाही, असा एक ना अनेक गोष्टी तिच्या टीमने एकताला सांगितल्या. त्यावर एकता म्हणाली, ही तुलसी आहे. यानंतर मी एकता कपूरच्या त्या मालिकेसाठी मनापासून मेहनत घेतली. मी माझ्या लग्नाच्या दिवशीही या कार्यक्रमाचा भाग शूट केला होता. तसेच माझी डिलिव्हरी होण्याच्या एक दिवस आधीही मी हा कार्यक्रम करत होती. ज्या दिवशी तिची प्रसूती होणार होती त्या दिवसाचेही दिवशी शूटिंग करण्यात आले होते”, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

स्मृती इराणीने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ याबरोबर अनेक मालिकेत काम केले आहे. तिने अनेक बंगाली चित्रपटातही काम केले. पण आजही लोक तिला तुलसी या पात्राच्या नावानेच ओळखतात. सध्या स्मृती इराणी या राजकारणात जास्त सक्रिय आहेत. तसेच एकता कपूर आणि त्यांची फार चांगली मैत्री आहे.