केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे स्मृती इराणी या प्रसिद्धीझोतात आल्या. यात त्यांनी ‘तुलसी विरानी’ ही भूमिका साकारली होती. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. स्मृती इराणी यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास खूप खडतर होता. नुकतंच त्यांनी जुन्या दिवसांच्या काही कटू आठवणी शेअर केल्या आहेत.
स्मृती इराणी यांनी नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी एकता कपूर यांच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेदरम्यान जेवणात झुरळ आढळलं होतं. त्याविरोधात स्मृती इराणींनी चांगलाच संताप व्यक्त केला होता.
आणखी वाचा : “मॅडम, वजन कमी करण्यासाठी टीप्स द्या”, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकजण थक्क
“एक दिवस या मालिकेच्या निर्मात्या शोभा कपूर या माझ्याकडे आल्या. त्यांनी मला विचारले, स्मृती तू बाहेर का बसली आहे, चहा का प्यायली नाहीस? त्यावर मी म्हणाले, चहाचा ब्रेक हा फक्त कलाकारांना नाही तर इतर सेटवरील मंडळींनाही मिळायला हवा. त्यांना माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी यासाठी होकार दिला”, असे स्मृती इराणींनी सांगितले.
“त्यानंतर एका सेटवर जेवत असताना टेक्निशिअन (तंत्रज्ञ) च्या जेवणात मला झुरळ आढळले. मी याबद्दल तक्रार करण्यास जात असताना मला त्या संबंधित व्यक्तीने थांबवले. त्यांनी मला सांगितले की आम्हाला जेवण देणारा कॅटरर्स हा खूप मोठा व्यक्ती आहे. त्यावर मी त्याला बसण्यास सांगितले. यानंतर मी सेटवर संताप व्यक्त करत चांगलंच सुनावलं.
यापुढे आम्हा कलाकारांना ज्या कॅटरर्सकडून जेवण मागवलं जातं, त्याच्याचकडून इतर सहकाऱ्यांसाठीही जेवणाची सोय करा. यापुढे मालिकेच्या युनिटला एकसारखेच अन्न मिळेल. जर असं झालं नाही, तर दुसऱ्या दिवशीपासून मी काम करणं बंद करेन”, असा किस्सा स्मृती इराणी यांनी सांगितला.
आणखी वाचा : “हिला काहीच येत नाही…” स्मृती इराणींनी केला ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या कास्टिंगबद्दल खुलासा
स्मृती इराणीने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ याबरोबर अनेक मालिकेत काम केले आहे. तिने अनेक बंगाली चित्रपटातही काम केले. पण आजही लोक तिला तुलसी या पात्राच्या नावानेच ओळखतात. सध्या स्मृती इराणी या राजकारणात जास्त सक्रिय आहेत.