social media star kili paul dance with bollywood actress madhuri dixit on jhalak dikhlaja set | Loksatta

Video : बॉलिवूड गाण्यांवर रिल्स बनवणाऱ्या किली पॉलसह माधुरी दीक्षितने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

‘झलक दिखला जा’ शोमध्ये सोशल मीडिया स्टार किली पॉलने हजेरी लावली. यावेळी माधुरी दीक्षितसह त्याने हिंदी गाण्यावर ठेकाही धरला.

Video : बॉलिवूड गाण्यांवर रिल्स बनवणाऱ्या किली पॉलसह माधुरी दीक्षितने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल
‘झलक दिखला जा’ सोशल मीडिया स्टार किली पॉलने हजेरी लावली. (फोटो : कलर्स टीव्ही)

कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या लोकप्रिय शोचा १०वा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतंच या शोमध्ये सोशल मीडिया स्टार किली पॉलने हजेरी लावली. पॉलने त्याच्या डान्सने शोला चार चांद लावले. यावेळी धक धक गर्ल माधुरी दीक्षितसह त्याने हिंदी गाण्यावर ठेकाही धरला.

‘झलक दिखला जा’ शोचे बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित परिक्षण करत आहे. या शोमध्ये किली पॉल माधुरी दीक्षितसह ‘चने के खेत में’ गाण्यावर थिरकला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ माधुरी दीक्षितच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये किली पॉल आणि माधुरी दीक्षित गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहेत. शोमध्ये पॉलने माधुरी दीक्षितचा तो चाहता असल्याचं म्हणत तिच्यासाठी गाणं गाण्याची इच्छा ही व्यक्त केली. ‘झलक दिखला जा’च्या सेटवर ‘राता लंबिया’ हे गाणं त्याने माधुरीसाठी गाऊन त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा >> Video : प्राजक्ता सूत्रसंचालनाची तयारी कशी करते?, अभिनेत्रीने शेअर केला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवरील खास व्हिडीओ

हेही पाहा >> Photos : दहावीत तीनदा नापास, तुरुंगवास ते जॅकलिन फर्नांडिसला डेट…’बिग बॉस’मधील साजिद खानबद्दलच्या खास गोष्टी माहीत आहेत का?

कोण आहे किली पॉल?

किली पॉल हा सोशल मीडिया स्टार आहे. तो मुळचा टांझानिया येथे राहणारा आहे. बहीण नीमा पॉल आणि तो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहेत. बॉलिवूड गाण्यांवर ते दोघेही रिल्स बनवतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर ४२ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. टांझानियातील भारतीय उच्चायुक्त बिनिया प्रधान यांनी भारतीय दूतावासात किलीला बोलावून त्याचा सत्कारही केला होता.

हेही वाचा >> प्रिया बापटचा वेब सीरिजमधील बोल्ड सीनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आई म्हणाली, “चूक झाली…”

किली पॉलचे बॉलिवूड गाण्यांवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात. तो ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वात दिसणार असल्याचीदेखील चर्चा आहे. वाइल्ड कार्ड म्हणून किली पॉल ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video : प्राजक्ता सूत्रसंचालनाची तयारी कशी करते?, अभिनेत्रीने शेअर केला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवरील खास व्हिडीओ

संबंधित बातम्या

Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा
Video: हळदी कार्यक्रमात बेभान होऊन नाचले राणादा-पाठकबाई, मित्रांनी उचलून घेतलं अन्…; अक्षया-हार्दिकचा डान्स व्हिडीओ व्हायरल
“तुमच्या शरीराची ठेवण…” बोल्ड फोटो शेअर करत प्राजक्ता माळीने दिला हटके सल्ला
सनी लिओनीने कपड्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तू माझ्या कपड्यांबरोबर…”
“ज्या हॉटेलमध्ये मी एक रात्र राहिले त्याचे कर्मचारीच…” तेजस्विनी लोणारीने सांगितला ‘तो’ अनुभव

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा
जॉन्सन्सची बेबी टाल्कम पावडर वापरासाठी सुरक्षित; प्रयोगशाळांतील अहवातून स्पष्ट
मुंबई: नायर दंत रुग्णालयात उभारणार अद्ययावत प्रयोगशाळा
मुंबई: नवजात बालकाला इमारतीवरून फेकणाऱ्या महिलेला तीन वर्षांनी जामीन