Sonali Bendre Kon Honaar Crorepati : ‘कोण होणार करोडपती’चा नवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा सुपरस्टार माधुरी दीक्षितने या शोच्या होस्टिंगची धुरा सांभाळली आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये माधुरीसह अभिनेत्री सोनाली बेंद्रे सहभागी झाली होती. सोनालीने या शोमध्ये जिंकलेली रक्कम ‘Happy Pet Foundation’ या संस्थेला दिली आहे.

सोनालीने हा संपूर्ण खेळ खूप स्मार्टली खेळला. प्रत्येक प्रश्नाचं तिने फार विचार करून उत्तर दिलं. अभिनेत्रीने १२ लाख ५० हजार इतकी रक्कम Happy Pet Foundation या संस्थेसाठी जिंकली आहे.

सोनालीला १२ लाख ५० हजारांसाठी शेवटचा प्रश्न खालीलप्रमाणे विचारण्यात आला होता.

भरतकामाच्या यांपैकी कोणत्या शैलीच्या नावाचा शब्दश: अर्थ ‘सोन्याचे भरतकाम’ असा होतो?

जरदोजी, कलमकारी, फुलकारी, मधुबनी…असे पर्याय अभिनेत्रीला देण्यात आले होते. यावर सोनालीने कोणतीही Lifeline न वापरता ‘जरदोजी’ उत्तर दिलं आणि ती १२ लाख ५० हजार जिंकली. यावेळी माधुरीने सीझनचा पहिला चेक सही करून सोनालीला सुपूर्द केला.

madhuri sonali
माधुरी दीक्षित – सोनाली बेंद्रे

तसेच दोन लोकप्रिय अभिनेत्री एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही असे बरेच गैरसमज लोकांमध्ये असतात. पण, या शोच्या निमित्ताने प्रेक्षकांचे हे गैरसमज दूर झाले असतील असं माधुरीने या एपिसोडच्या शेवटी सांगितलं आणि सोनालीने या मंचाचा निरोप घेतला.