Keshavrao Bhosale Theater Kolhapur Massive Fire : कोल्हापुरातील प्रसिद्ध ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागल्याने खाक झालं. यामुळे कलाप्रेमी कोल्हापुरकरांमध्ये आणि मराठी नाट्यसृष्टीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही भीषण आग रंगमंचापर्यंत पसरली होती. शॉर्टसर्किटमुळे नाट्यगृहाला आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. पण नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे नागरिकांसह कलाकारांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षदर्शी अभिनेत्री सोनाली पाटीलच्या ( Sonali Patil ) अश्रूंचा बांध फुटला. म्हणाली, "आमचं वैभव पूर्ण खाक झालं." अभिनेत्री सोनाली पाटीलने ( Sonali Patil ) "वाईट बातमी" असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला आहे; जो केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेरील व्हिडीओ आहे. यामध्ये भावुक झालेली सोनाली म्हणतेय की, "तुम्हाला सगळ्यांना माहितीये. माझी ओळख करून देण्याची गरज नाहीये आणि ही वेळ पण नाहीये. मी आता कोल्हापुरमध्ये आहे. आजच कोल्हापुरला आलेली आहे. आजचा सगळ्यात वाईट दिवस आमच्या कोल्हापुरकरांसाठी आणि पूर्ण रंगभूमीसाठी आहे. तो म्हणजे केशवराव भोसले पूर्ण जळून खाक झालं आहे. ज्या पद्धतीने सगळी लोक इकडे येतायत. बघायची इच्छा होत नाहीये. आमची सगळ्यांची नाळ जिथे जोडली गेलेली आहे. ज्या रंगभूमीवरती आणि रंगमंचावरती उभा राहिलो. आमची नाटकं एवढी झाली. ती गोष्ट, आमचं सगळ्यात मोठं घर किंवा आमचं वैभव जे आहे ते पूर्ण खाक झालं आहे. हीच गोष्ट सगळ्यांना मला सांगायची होती की, मला माहिती नाहीये पुन्हा ते उभं राहिलं तर कसं उभं राहिलं." एवढं बोलल्यानंतर सोनालीचे अश्रू अनावर झाले आणि ती रडू लागली. हेही वाचा - Video: “डोळ्यात पाणी आणलंत…”, ड्रामा ज्युनिअर्सने ‘धर्मवीर’ चित्रपटातील केलेला ‘तो’ सीन पाहून प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ सोनालीचा ( Sonali Patil ) हा व्हिडीओ पाहून अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर म्हणाले, "खूप वाईट झालं." तर शर्वरी जोग म्हणाली, "खूप वाईट..खूप जास्त वाईट." तसंच नकुल घाणेकर म्हणाला, "काळजी घे." सोनालीच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. हेही वाचा – ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’नंतर मिलिंद गवळींना मिळालेले ४० चित्रपट, जुन्या आठवणी सांगत म्हणाले… Keshavrao Bhosale Theater (Photo Credit - Graphic Team) चौकशी झाली पाहिजे - नेटकरी दरम्यान, आजच ९ ऑगस्टला संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. आणि आदल्याच दिवशी ८ ऑगस्टला नाट्यगृहाला आग लागल्यामुळे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. सोनाली पाटीलच्या ( Sonali Patil ) व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, "आज जयंती आहे आणि काल अचानक आग? १३५ वर्ष झालीत. ऐतिहासिक ठेवा होता." तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, "चौकशी झाली पाहिजे. पूर्ण जळून खाक होईपर्यंत कोणालाच समजलं नाही का? थोडी पण आग दिसली की माणस सावध होतात लगेच. आग विझवली जाते. इथे एवढं मोठं नाट्यगृह जळतं होतं तरी कोणाला दिसलं नाही का? कोणीतरी जाणीवपूर्वक केलं आहे हे."