Devmanus Fame actress Sonam Mhaswekar shares experience: ‘देवमाणूस’ मालिकेतील गोपाळ हे पात्र नेहमीच लक्ष वेधून घेते. मात्र गोपाळबरोबरच सध्या आणखी एका पात्राची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.
देवमाणूसमधील लाली हे पात्र सध्या मोठ्या चर्चेत आहे. गोपाळ जेव्हा अनेक वर्षानंतर जेव्हा परत घरी परतला, तेव्हा लाली आणि गोपाळचे लग्न लावून देण्यात आले. लाली गोपाळच्या प्रेमात पडली. मात्र गोपाळने तिच्यावर कधीच प्रेम केले नाही. त्याला लाली कधीच आवडली नाही.
दुसरीकडे गोपाळ गावातील इतर स्त्रियांच्या प्रेमात पडतो. जेव्हा लालीला माधुरी आणि गोपाळ पळून जाणार आहेत, असे समजले. तेव्हा तिने माधुरीचा खून केला. त्यानंतर आर्या गावात आली. गोपाळ आणि तिची ओळख झाली. आर्या गोपाळच्या प्रेमात पडली. गोपाळने तिच्या प्रेमात असल्याचे नाटक केले.
गोपाळने तिला सांगितले की लालीचा बॉयफ्रेंड आहे आणि लवकरच तो लालीचे लग्न करून देणार असल्याचे सांगितले. जेव्हा लालीला आर्या गोपाळच्या प्रेमात, ती त्याच्या बाळाची आई होणार असल्याचे समजले. तेव्हा तिने आर्याचा खून केला. गोपाळ आणि तिच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला ती संपवत असल्याचे दिसत आहे.
सोनम म्हसवेकर म्हणाली…
आता मालिकेत लाली ही भूमिका सोनम म्हसवेकरने साकारली आहे. आता या भूमिकेबद्दल अभिनेत्रीने वक्तव्य केले आहे. तिने नुकतीच ‘महाराष्ट्र टाइम्स’ला मुलाखत दिली.
ती म्हणाली, “प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाने मन भरून आले आहे. खुनी असूनही लालीचा राग येण्याऐवजी प्रेक्षकांना तिच्याविषयी काळजी आणि सहानुभूती वाटते. लाली फ्लॉवर नाही फायर आहे अशा प्रतिक्रियाही मला मिळतात”, असे सोनम म्हणाली.
पुढे ती असेही म्हणाले, “लोकप्रिय मालिकेत काम करताना थोडंसं दडपण होतं. तसंच किरणने उभ्या केलेल्या व्यक्तिरेखेच्या तोडीस तोडी काम करणं हे आव्हानही होतं. या सगळ्यात दिग्दर्शकांचं मार्गदर्शनही महत्त्वाचं ठरलं. ते सांगतील त्याप्रमाणे काम करत गेले. शांत निर्विकार चेहऱ्यामागे कथानकातील सगळं रहस्य लपवून ठेवायचं होतं. नाहीतर मी खून केला हे प्रेक्षकांना कळलं असतं. असा अभिनय करणं आव्हानात्मक होतं. तसेच तो बेरकी खुनशीपणा साकारताना मानसिक आणि शारीरिक मेहनतही मला घ्यावी लागली. भूमिकेचा आलेख इतका वर जाईल याची सुरुवातीला कल्पना नव्हती. पण लाली या भूमिकेतून मला स्वतःला सिद्ध करता आलं”, असे म्हणत सोनमने तिच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
