scorecardresearch

…अन् ‘सोनी टीव्ही’ने मागितली जाहीर माफी; श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारीत भाग दाखवल्यानं प्रेक्षकांची नाराजी, घेतला मोठा निर्णय

‘क्राइम पेट्रोल’मध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारीत भाग दाखवल्यानंतर सोनी टीव्हीने मागितली माफी, प्रेक्षक संतापल्याने घेतला मोठा निर्णय

…अन् ‘सोनी टीव्ही’ने मागितली जाहीर माफी; श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारीत भाग दाखवल्यानं प्रेक्षकांची नाराजी, घेतला मोठा निर्णय
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या वर्षी घडलेल्या श्रद्धा वालकर मृत्यू प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होत. वसईतील श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने हत्या केली होती. त्याने श्रद्धाचा निर्घृण खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीतील जंगलात फेकले होते. या धक्कादायक घटनेतून अजूनही लोक सावरलेले नाहीत. अशातच सोनी टेलिव्हिजनच्या ‘क्राइम पेट्रोल’ या मालिकेने श्रद्धा प्रकरणावर आधारित एक एपिसोड प्रसारित केला होता. ‘क्राइम पेट्रोल २.०’ या नव्या सीझनमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडावर बेतलेला एक एपिसोड दाखवण्यात आला.

श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारीत ‘क्राइम पेट्रोल’चा नवा भाग पाहून प्रेक्षक संतापले, म्हणतायत ‘बॉयकॉट सोनी टीव्ही’

हा एपिसोड श्रद्धा वालकर प्रकरणावर आधारीत असल्याचं म्हटलं गेलं नव्हतं. पण, प्रेक्षकांना त्यातील संदर्भ लगेच समजले आणि यातील मुख्य भूमिका सकारणाऱ्या लोकांचा धर्म बदलल्याने ते आणखीनच संतापले. या एपिसोडमध्ये मुलीचे नाव एना फर्नांडिस होतं आणि ती ख्रिश्चन असल्याचं दाखवलं होतं. तर, मुलगा हिंदू दाखवण्यात आलं. पण दृश्ये आणि कथेतील साम्य लक्षात येताच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर विरोध दर्शवायला सुरुवात केली. ‘अहमदाबाद पुणे मर्डर’ या टायटल खाली हा एपिसोड २७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसारित करण्यात आला होता.

लोकांनी यातील व्हिडिओ क्लिप्स शेअर करत याचे संदर्भ लावले आणि वाद वाढला. त्यांनी सोशल मीडियावर ‘बॉयकॉट सोनी टीव्ही’ हा ट्रेंडही चालवला. आता या प्रकरणी सोनी टीव्हीने निवेदन देत माफी मागितली आहे.

सोनी चॅनलने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं, ‘काही दर्शकांनी ‘क्राइम पेट्रोल’च्या अलीकडील एका भागावर कमेंट करत ती काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेसारखी वाटते. पण तसं नसून ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि ती 2011 मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणावरून प्रेरित आहे. या कथेचा किंवा प्रसंगाचा कोणत्याही अलीकडील घटनेशी कोणताही संबंध नाही. आमच्या चॅनलवर प्रसारित होणारा कंटेंट प्रसारणाच्या मानक आणि नियमांनुसार आहे, याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. पण या प्रकरणात, आम्ही प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन एपिसोड हटवला आहे. या एपिसोडच्या प्रसारणामुळे आमच्या प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागत आहोत,” असं त्या पत्रात म्हटलंय.

दरम्यान, प्रेक्षकांचे आक्षेप व विरोधानंतर सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तो एपिसोड हटवण्यात आला आहे, अशी माहिती चॅनलने दिली आहे. तसेच त्यांनी प्रेक्षकांची माफीही मागितली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 11:55 IST

संबंधित बातम्या