Pallak Yadav and Nikhil Malik Breakup : आपल्या देशात रिअॅलिटी शोची खूप क्रेझ आहे. बरेच लोक अभिनय क्षेत्रात येण्यासाठी रिअॅलिटी शोपासून सुरुवात करतात. या शोमध्ये काही स्पर्धक एकत्र येतात, एकमेकांच्या प्रेमातही पडतात. यापैकी काही नाती टिकतात, तर काही नाती मात्र फार काळ टिकत नाहीत. कालांतराने विविध कारणं देतात जोडपी ब्रेकअप करतात. आता अशाच एका रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांनी ब्रेकअपची घोषणा केली आहे.

स्प्लिट्सव्हिला हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय डेटिंग रिॲलिटी शोपैकी एक आहे. या शोचा १३ वा सीझन खूप गाजला होता. मराठमोळा अभिनेता जय दुधाणे आणि अदिती राजपूत या पर्वाचे विजेते ठरले होते. पण या शोमध्ये आणखी एक जोडी खूप लोकप्रिय ठरली होती, ती म्हणजे पलक यादव आणि निखिल मलिक होय. आता निखिल व पलक यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
Pune Man Leaves One-Star Review For Gym After Girlfriend Cheats On Him
जीम लावली अन् गर्लफ्रेंड गमावली! पुणेकर तरुणाने Reviewमध्ये सांगितली ब्रेक-अप स्टोरी, Viral Post एकदा बघाच
shilpa shetty
ईडीच्या छापेमारीनंतर शिल्पा शेट्टीची पहिली पोस्ट; म्हणाली, “जीवनात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते…”
Shahid Kapoor
“माझा प्रेमभंग झाला…”, शाहिद कपूर आठवण सांगत म्हणाला, “मी स्वत:ला उद्ध्वस्त…”
Prathmesh Parab
“आईबाबा आणि साईबाबा शप्पथ…”, प्रथमेश परबसाठी पत्नी क्षितिजाची खास पोस्ट; म्हणाली, “पहिल्या भेटीतील…”
Pallak Yadav and Nikhil Malik breakup
पलक यादव व निखिल मलिक (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – “खेळ अजून संपलेला नाही”! Bigg Boss Marathi मध्ये परतणार रितेश देशमुख; म्हणाला, “या सीझनचा सर्वात मोठा धक्का…”

सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती

निखिल आणि पलक या दोघांनीही इन्स्टाग्राम स्टोरीजवर त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली. यापुढे एकत्र नसू, पण दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे, असं त्यात लिहिलंय. “जड अंत:करणाने पलक आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही रिलेशनशिपमध्ये नसू मात्र आम्हाला एकमेकांबद्दल आदर आहे. आम्ही स्वतःवर आणि आमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम करू,” असं निखिलने लिहिलं.

हेही वाचा – ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने नाकारली बिग बॉस १८ची ६५ कोटी रुपयांची ऑफर, कोण आहे ती?

पलक यादवने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली. “आम्ही बेस्ट फ्रेंड म्हणून आमच्या नात्याची सुरुवात केली होती आणि यापुढेही आम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड राहू. मला आशा आहे की तुम्ही समजून घ्याल आणि आमच्यावर प्रेम करत राहाल. पलक आणि निखिल,” असं तिने लिहिलं.

हेही वाचा – Video: ग्रँड फिनालेआधी बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट; घोषणा ऐकताच स्पर्धकांना बसला धक्का, नेमकं काय घडलं?

निखील व पलक स्प्लिट्सव्हिला १३ मध्ये भेटले होते. २०२१ मध्ये हा सीझन आला होता. ते दोघे या शोमध्ये पहिल्याच दिवशी कनेक्ट झाले होते, पण आता तीन वर्षांनी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader