दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील “अंगारो सा…” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड होऊ लागलं. सध्या मोठमोठे सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

“अंगारो सा…” या ‘पुष्पा २’ मधील गाण्यावर आतापर्यंत सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच रील्स व्हिडीओ बनवले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर सुद्धा सध्या ‘पुष्पा’चा फिव्हर चढल्याचं पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकर, ‘पारु’ मालिकेतील कलाकार, ईशा केसकर या कलाकारांपाठोपाठ आता अभिनेत्री स्पृहा जोशी ‘पुष्पा २’ चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर थिरकली आहे.

हेही वाचा : “झोपेत असताना गोळीबाराचा आवाज आला अन्…”, सलमान खानने पहिल्यांदाच पोलिसांना सांगितला ‘त्या’ दिवशीचा घटनाक्रम

“अंगारो सा…” गाण्यावर जबरदस्त डान्स करत स्पृहाने ट्रान्सिशन व्हिडीओ बनवला आहे. या गाण्यात एक मोठा ट्विस्ट आहे तो म्हणजे “अंगारो सा…” गाण्यात “एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं” हे मराठमोळं गाणं जोडण्यात आलं आहे. या दोन्ही गाण्यांचं मिळून तयार केलेलं रिमिक्स व्हर्जन सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

स्पृहा जोशीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. आजवर मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. स्पृहाने नुकतीच अल्लू अर्जुन आणि रश्मिकासारखी हुक स्टेप करत “अंगारो सा..” आणि “एक लाजरान साजरा मुखडा” या दोन्ही गाण्यांवर मिळून जबरदस्त डान्स केला आहे. “लाइट्स, कॅमेरा…फन! स्वाती देवल हे फक्त तुझ्यामुळे झालंय” असं कॅप्शन अभिनेत्रीने या डान्स व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : “मला मोदींना स्कलकॅप घातलेलं बघायचंय”, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचं विधान चर्चेत; कारण सांगताना म्हणाले, “भाजपाचा मुस्लीमद्वेष…”

दरम्यान, स्पृहाच्या या मराठमोळ्या ठसक्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अक्षया नाईक, स्वाती देवल, नम्रता संभेराव, अश्विनी कासार या अभिनेत्रींनी सुद्धा कमेंट्स करत स्पृहाचं कौतुक केलं आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘सुख कळले’ या कलर्स मराठीवरील मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.