Spruha Joshi Sukh Kalale Serial Off Air : छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी मोठी चढाओढ असल्याचं पाहायला मिळत आहे. दमदार कथानक, नव्या कलाकारांची एन्ट्री, रंजक वळण या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतात. आता येत्या काळात विविध वाहिन्यांवर नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. या सगळ्या नव्या मालिकांबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, काही जुन्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशीची ( Spruha Joshi ) प्रमुख भूमिका असलेली ‘सुख कळले’ मालिका २२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित करण्यात येते. मात्र, आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. स्पृहा जोशीने सेटवरचे व्हिडीओ, फोटो व पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या कॅप्शनवरून मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ही मालिका सुरू होऊन आता जवळपास फक्त ५ महिने पूर्ण होतील.

bigg boss marathi dhananjay powar first reaction after lost in finale
Video : “ट्रॉफी मिळाली नाही याची खंत…”, ग्रँड फिनालेनंतर धनंजयची पहिली पोस्ट! भावुक होत म्हणाला, “हे उपकार…”
Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan look viral connection with bhaucha dhakka
ट्रॉफी घेऊन सूरज आला माध्यमांसमोर! हटके लूकने वेधलं…
Jitendra Awhad For Suraj Chavan
“आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून…”, जितेंद्र आव्हाडांची सूरज चव्हाणसाठी पोस्ट; म्हणाले, “जिंकलंस भावा…”
Bigg Boss 18 lawyer Gunaratna Sadavarte entry in salman khan show pps 98
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी ‘बिग बॉस १८’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर काय घडलं? ते काय म्हणाले? जाणून घ्या…
kedar shinde big announcement for suraj chavan and praises riteish deshmukh
“एका ग्रेट माणसाची…”, रितेशला मिठी मारत केदार शिंदेंची खास पोस्ट! तर, सूरज चव्हाणसाठी केली मोठी घोषणा
Shilpa Shirodkar
“… पण कोणीही माझा फोन उचलला नाही”, शिल्पा शिरोडकरने सांगितले ‘बिग बॉस १८’मध्ये येण्याचे कारण; म्हणाली, “लोक मला…”
bigg boss marathi marathi actress mitali mayekar raise questions
“रिअ‍ॅलिटी की Sympathy शो…” मराठी अभिनेत्रीचा रोख सूरजकडे? सवाल विचारत म्हणाली…
Abhijeet sawant Birthday Celebration Video
Bigg Boss Marathi 5चा उपविजेता अभिजीत सावंतचा आज वाढदिवस, पत्नी व मुलींबरोबर ‘असं’ केलं सेलिब्रेशन, पाहा Video
Bigg Boss Marathi Season 5 Winner Utkarsh Shinde make news song for suraj Chavan
Video: सूरज चव्हाण विजयी होताच उत्कर्ष शिंदेचं जबरदस्त गाणं, लिहिली मार्मिक पोस्ट, म्हणाला, “जे जळत असतील त्यांनी…”

हेही वाचा : Video : तीन वर्षांपूर्वी नौदल अधिकाऱ्याशी बांधली लग्नगाठ, अभिनेत्री ३७ व्या वर्षी होणार आई, व्हिडीओ शेअर करून दिली Good News

स्पृहाने शेअर केली खास पोस्ट

स्पृहा लिहिते, “काही प्रवास लहान असतात…पण, निरोप घेणं तेवढंच कठीण जातं. तुम्हा सर्वांबरोबर काम करून खूपच मजा आली…सर्वांबरोबर छान वेळ घालवला. सर्वांचे धन्यवाद आणि दिलेल्या संधीबद्दल मी कायम कृतज्ञ असेन”

spruha
स्पृहा जोशीची ‘सुख कळले’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ( Spruha Joshi )

हेही वाचा : Bigg Boss Marathi: वैभव झाला Eliminate; जान्हवी-अरबाजला अश्रू अनावर, जाताना दोघांनाही दिली खास पॉवर, जाणून घ्या…

हेही वाचा : “प्रिय आदेश भावोजी…”, पोस्टमन काकांनी वाचलं खास पत्र! सगळेच झाले भावुक; ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाने २० वर्षांनंतर घेतला निरोप

दरम्यान, ‘सुख कळले’ या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी ( Spruha Joshi ) व सागर देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यामध्ये कालांतराने आशय कुलकर्णीने एन्ट्री घेतली. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहमच्या ‘सोहम प्रोडक्शन हाऊस’ची ही मालिका होती. आता या मालिकेचा शेवटचा भाग केव्हा प्रसारित होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. याशिवाय स्पृहाबद्दल सांगायचं झालं, तर ‘उंच माझा झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकांमुळे स्पृहा जोशी घराघरांत लोकप्रिय झाली. चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयाप्रमाणेच स्पृहा तिच्या कवितांमुळे देखील चर्चेत असते.