scorecardresearch

एका मुलीच्या आत्मसन्मानाची लढाई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! मालिकेचा प्रोमो चर्चेत

फालतूची कथा पुढे कशी उलगडत जाईल यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

एका मुलीच्या आत्मसन्मानाची लढाई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! मालिकेचा प्रोमो चर्चेत
star plus new serial

मालिका विश्वात सध्या नवेनवे विषय हाताळले जात आहेत. मग स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात असो किंवा समाजातील अनिष्ट प्रथांच्या विरोधात आवाज असो, टीव्हीवरील प्रत्येक वाहिनी वेगळेपण जपत आहे. ग्रामीण भागातील समस्या मालिकेच्या मार्फत शहरी लोकांपर्यंत पोहचत आहेत. ऐतिहासिक, पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. हिंदी वाहिनी स्टार प्लस गेली अनेकवर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. ‘फालतू’ नावाच्या एका नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी याचा प्रोमो सादर केला आहे.

मालिकेच्या प्रोमोमध्ये एका अशा तरुणीच्या जीवनातील समस्यांवर प्रकाश टाकतो, जिच्या कुटुंबानेच सतत तिचे व्यक्तिमत्व डावलले आणि जी कुटुंबाची कोणीच नाही असे समजून वागवले. कठीण काळातही हार न मानता फालतू स्वतःचे व्यक्तिमत्व कसे सिद्ध करते, हे पाहणे औत्सक्याचे ठरेल. या मालिकेतील मुलीची पार्श्वभूमी राजस्थानमधील दाखवण्यात आली आहे. ‘फालतू’ची कथा ही त्या प्रत्येक मुलीच्या कथेवर प्रकाश टाकते ज्यांना आपल्याच कुटुंबात नाकारले जाते, दूर लोटले जाते, व अपमानित केले जाते. अशी वागणूक मिळत असून सुद्धा, ‘फालतू’ आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर स्वप्नापूर्तीसाठी झुंजते.

ते कर्ज मी आजवर… ” मित्राकडून उधार घेतलेल्या पैशांबद्दल सलमान खानने केला होता खुलासा

आज समाजातील प्रत्येक स्तरातील स्त्री स्वतःच्या अस्तिस्त्वासाठी संघर्ष करताना दिसून आली आहे. स्टार प्लस वाहिनीनेदेखील अशाच एका मुलीची कथा प्रेक्षकांसाठी आणली आहे जिचे अस्तित्व कुटुंबानेच नाकारले आहे. प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असून, फालतूची कथा पुढे कशी उलगडत जाईल यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

बॉयहूड प्रोडक्शन यांनी मालिकेची निर्मिती केली आहे. मालिकेत अभिनेता आकाश आहुजा, निहारिका चौकसे हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यांच्याबरोबरीने हार्दिक शर्मा, जयदीप सिंग, काजल राठोड, आर्यन शाह, माराया सिंग, पाहू बिस्वास, आकाश अहुजा हे कलाकार दिसणार आहेत. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रदर्शनाची तारीख लवकरच निर्माते जाहीर करणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या