Angad Mhaskar and Neha Phadke Relationship: मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. गायत्री दातार आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या लग्नाच्या बातम्या ताज्या असतानाच, आता एका लोकप्रिय अभिनेत्याने आपल्या जोडीदाराची ओळख करून दिली आहे. स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अंगद म्हसकर यांनी आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. नेहा फडके असं त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे.

मराठी मालिकाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री गायत्री दातारने लग्न केलं. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम काव्या अर्थात ज्ञानदा रामतीर्थकरने हर्षद आत्मारामशी आज (८ मे रोजी) लग्नगाठ बांधली. अशातच आता एका मराठी अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने होणाऱ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला आहे.

स्टार प्रवाहच्या ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असलेले अभिनेते अंगद म्हसकर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे. त्यांच्या गर्लफ्रेंडचं नाव नेहा फडके आहे. अंगद यांनी नेहाबरोबरचा कारमधील एक सेल्फी शे्र केला आहे. ‘From here to forever’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

पाहा अंगद म्हसकर यांची पोस्ट

अनेक ऐतिहासिक मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते अंगद म्हसकर यांनी होणाऱ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे अंगद व नेहा लवकरच लग्न करतील, असं दिसतंय. अंगद म्हसकर यांनी आतापर्यंत ‘लोकमान्य’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘मुंबई पुणे मुंबई’ अशा चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

अंगद म्हसकर यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करून अभिनंदन केलं आहे. दोघांनाही नवीन प्रवासासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.