Star Pravah Halad Rusli Kunku Hasla Serial Off Air : स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या १० ऑगस्टपासून ऐश्वर्या नारकरांची मुख्य भूमिका असलेली ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. आता नव्या मालिका सुरू झाल्यावर वाहिनीवरील काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतील. आता ही ऑफ एअर होणारी मालिका कोणती आहे जाणून घेऊयात…

स्टार प्रवाहवर दुपारच्या आणि रात्रीच्या अशा दोन सत्रात मालिका प्रसारित केल्या जातात. गेल्यावर्षी ७ जुलै २०२५ रोजी ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका दुपारच्या सत्रात ऑन एअर झाली होती. या मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. पण, आता वर्ष पूर्ण झाल्यावर ही सिरियल ऑफ एअर होणार आहे. स्वत: मुख्य अभिनेत्रीने याबाबत माहिती दिली आहे.

‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या दोघांनी अनुक्रमे कृष्णा आणि दृष्यंत यांच्या भूमिका साकारल्या होत्या. आता कृष्णा-दृष्यंतची जोडी सर्वांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

समृद्धी केळकर म्हणते, “कृष्णा म्हणून शेवटचे काही क्षण… One Last Time, सेटवरची शेवटची रात्र, शूटिंग संपलंय मी तुमचा निरोप घेते. Signing Off…माझं मन खरंच भरून आलं आहे”

समृद्धीने पोस्ट शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांचा कृष्णाच्या भूमिकेतून निरोप घेतला आहे. ही मालिका दुपारी १ वाजता प्रसारित केली जायची. आता वर्षभराने ‘हळद रुसली कुंकू हसलं’ सिरियल सर्वांचा निरोप घेणार आहे. लवकरच याच्या अंतिम भागाचा प्रोमो प्रेक्षकांसमोर येईल. आता अंतिम भागात काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

marathi serial off air
समृद्धी केळकरची पोस्ट

दरम्यान, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका संपल्यावर १० ऑगस्टपासून दुपारी १ वाजता ‘वचन दिले तू मला’ ही सिरियल प्रसारित केली जाईल. तसेच सायंकाळी ६:३० वाजता ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिका ऑन एअर होईल.