आपल्या आवडत्या मालिकांमध्ये आगामी भागांत काय घडणार याची लहानशी झलक प्रेक्षकांना प्रोमोच्या माध्यमातून पाहायला मिळते. ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘लपंडाव’ यांसारख्या मालिकांचे प्रोमो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या प्रोमोने एक वेगळाच रेकॉर्ड केला आहे.

‘स्टार प्रवाह’वरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या मनात दिवसेंदिवस अधिक घट्ट स्थान निर्माण करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांची भावनिक गोष्ट प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. लवकरच मालिकेत एक अत्यंत खास आणि भावनिक टप्पा येणार आहे.

पार्थ आणि काव्या लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी समोर येणार आहे. प्रत्येक नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा आणि सुंदर प्रवास असतो, आणि मालिकेतही याच प्रवासाची सुरुवात होणार आहे. एकीकडे काव्याकडे गुडन्यूज असते, तर दुसरीकडे नंदिनीला ‘तिचं आई होणं कठीण आहे’ असं डॉक्टर सांगतात. त्यामुळे या दोन बहिणींच्या आयुष्यात एकाच वेळी येणार सुख-दुःख येईल.

Award Banner

फक्त २४ तासांत ५ मिलियनहून अधिक Views

या नव्या ट्विस्टचा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. अवघ्या २४ तासांत या प्रोमोने ५ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवत एक नवा विक्रम रचला आहे. सोशल मीडियावरही या प्रोमोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पार्थ-काव्याच्या या नव्या प्रवासासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. तर, जीवा-नंदिनीसाठी या प्रेक्षकांना तेवढंच दु:खही वाटतंय. आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत पुढे काय घडणार याचा अंदाजही नेटकरी कमेंट्समध्ये बांधत आहेत.

प्रेक्षकांकडून मिळणारं भरभरून प्रेम हे प्रत्येक कलाकारासाठी खूप खास असतं. या प्रतिसादामुळे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची संपूर्ण टीम आनंद व्यक्त करत असून, मालिकेत येणारं हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ३० आणि ३१ मार्चला सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना हा विशेष भाग पाहायला मिळेल.