Laxmichya Paulanni Serial Last Day Of Shooting : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. यापैकी ‘वचन दिले तू मला’ ही मालिका येत्या १५ डिसेंबरपासून रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या स्लॉटला ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका प्रसारित केले जाते. लवकरच या सिरियलचा शेवटचा भाग प्रक्षेपित केला जाईल आणि ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे.

२० नोव्हेंबर २०२३ रोजी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. आता येत्या १२ डिसेंबरला ही मालिका सर्वांचा निरोप घेण्याची शक्यता आहे. शेवटचा भाग केव्हा ऑन एअर होईल याचा प्रोमो अद्याप वाहिनीकडून शेअर करण्यात आलेला नाहीये. पण, या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालेलं असून सेटवर सगळ्या कलाकारांनी मिळून शेवटचा दिवस साजरा केला आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा दोन वर्षांचा प्रवास संपल्यावर सगळे कलाकार भावुक झाले होते.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’च्या सेटवर केक कापून सगळ्या कलाकारांनी एकत्र सेलिब्रेशन केलं. याशिवाय अभिनेता अद्वैत काडणे आणि तृष्णा चंद्रात्रे यांनी देखील सेटवरच्या मेकअप रुममधील खास फोटो शेअर करत याला ‘One Last Time’ असं कॅप्शन दिलं आहे. या मालिकेचं संपूर्ण शूटिंग पूर्ण झालेलं आहे. लवकरच अंतिम भागात काय घडणार याचा प्रोमो प्रेक्षकांसमोर येईल.

Award Banner

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेतील अद्वैत-कलाच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. यामध्ये अद्वैतची भूमिका अभिनेता अक्षर कोठारी आणि ईशा केसकरने कलानिधी ( कला ) खरे हे पात्र साकारलं होतं. ईशाने काही दिवसांपूर्वीच आजारपणाच्या कारणास्तव या शोमधून एक्झिट घेतली होती. तिच्या एक्झिटनंतर चाहते प्रचंड नाराज झाले होते. याचा परिणाम टीआरपीवर देखील झाला. नेहमी टॉप-५ मध्ये असणाऱ्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा टीआरपी गेल्या काही आठवड्यात कमी झाल्याचं पाहायला मिळालं.

त्यामुळे आता ईशाच्या एक्झिटनंतर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका अवघ्या महिन्याभरात सर्वांचा निरोप घेणार आहे. सेटवरील शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

marathi serial off air
मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत ईशा केसकर, अक्षर कोठारी यांच्यासह नक्षत्रा मेढेकर, किशोरी अंबिये, दीपाली पानसरे, अद्वैत काडणे, ऋत्विक तळवलकर, सानिका बनारसवाले, तृष्णा चंद्रात्रे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.