स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगली. या लढतीत कोथरुड पुणे येथील आकाश व सुरज मोरे या जिगरबाज जोडीने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर, उपविजेते पदाचा मान सिद्धेश थोरात – रुचिता जामदार तसेच अपेक्षा लोंढे – प्रतिक्षा लोंढे या दोन जोड्यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक पटकावला पूर्वा साळेकर व पलक मोरे या जोडीने. महाअंतिम सोहळ्यातील विजेती जोडी आकाश आणि सुरज मोरे यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. तर उपविजेत्या जोडीला दोन लाख याशिवाय तृतीय क्रमांक पटकावलेल्या जोडीला १ लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना आकाश आणि सुरज म्हणाले, “आम्ही आजवर बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला मात्र ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ या कार्यक्रमाने विजेतेपदाचा आनंद मिळवून दिला. आम्हाला आमचं कौशल्य सिद्ध करण्यासाठी हक्काचा मंच दिल्याबद्द्ल स्टार प्रवाह वाहिनीचे खूप खूप आभार. हा संपूर्ण प्रवास स्वप्नवत आहे. या क्षणाची खूप वाट पाहिली होती. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली होती. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं.”

Sexual assault with 10-year-old minor girl in Nalasopara two people arrested
नालासोपाऱ्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोन जणांना अटक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
Hanumankind music video woman maut ka kuan
Big Dawgs: ‘मौत का कुआं’मध्ये स्टंट करणारी कल्याणची कांचन आणि पती सुलतान शेखची प्रेम कहाणी, रॅपर साँगच्या माध्यमातून ठरली जगभरात चर्चेचा विषय
Boyfriend killed girlfriends four year old son after he vomits
उलटी केल्याने प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाचा खून,नाशिकमधील आरोपी अटकेत; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
Reclaim the night womens in kolkat took out these night marches
स्री-‘वि’श्व: ‘रिक्लेम द नाइट’
man in dression suicide
Up Tea Vendor Suicide: चहावाल्याने जिंकली ३.५ लाखांची लॉटरी, तरीही केली आत्महत्या; धक्कादायक कारण आले समोर
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

हेही वाचा : “रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात…”, अनंत अंबानीच्या लग्न सोहळ्याबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली…

आकाश आणि सुरज दोघेही सख्खे भाऊ आहेत. लहानपणापासूनच दोघांनाही नृत्याची आवड होती. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. मात्र, तरीही दोघांची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्यांच्या आईने त्यांना नृत्याचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. बरीच आव्हानं समोर होती. अनेक अडचणींचा सामना करत आकाश आणि सुरजने आपली नृत्याची आवड जोपासली.

हेही वाचा : “हिंदू-मुस्लीम लग्न करू शकत नाहीत का?” सोनाक्षी-झहीरच्या लग्नावर मुकेश खन्नांची प्रतिक्रिया; म्हणाले, “लव्ह जिहाद…”

छोट्या – मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या आकाश-सुरजला ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाविषयी समजलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली. ऑडिशन ते विजेते होण्याचा हा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. आकाश आणि सुरजचं यश पाहून त्यांच्या आईचे डोळे पाणावले होते. हे घवघवीत यश आकाश आणि सुरजचा पुढील प्रवास अधिक तेजोमय करेल हे नक्की. आकाश आणि सुरज जरी या पर्वाची विजेती जोडी असली तरी, या स्पर्धेतील सर्वच जोड्यांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे.