Star Pravah Parivar Puraskar 2026 Full Winner List : ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ‘महाराष्ट्राची महामालिका’ कोण ठरणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. महत्त्वाचं म्हणजे, ‘ठरलं तर मग’ मालिका गेली दोन वर्षे सलग सर्वोत्कृष्ट मालिका ठरली होती. त्यामुळे यंदा ‘ठरलं तर मग’ची हॅटट्रिक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, ही हॅटट्रिक अगदी थोड्यासाठी हुकली आहे.

यावर्षी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे. निवेदक अभिजीत खांडकेकरने मतांच्या अगदी थोड्या फरकाने या मालिकेने बाजी मारलीये असं यावेळी सांगितलं. तर, यावर्षी सर्वोत्कृष्ट जोडी हा पुरस्कार पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनीला विभागून देण्यात आला आहे.

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२६ – विजेत्यांची संपूर्ण यादी…

  1. महाराष्ट्राची महामालिका – लग्नानंतर होईलच प्रेम
  2. सर्वोत्कृष्ट परिवार : राजेशिर्के परिवार – तू ही रे माझा मितवा
  3. सर्वोत्कृष्ट पत्नी : कृष्णा – हळद रुसली, कुंकू हसलं
  4. सर्वोत्कृष्ट पती : अर्णव – तू ही रे माझा मितवा
  5. सर्वोत्कृष्ट खलनायिका : सरकार ( लपंडाव ) आणि राकेश ( तू ही रे माझा मितवा )
  6. सर्वोत्कृष्ट सून : सायली – ठरलं तर मग
  7. सर्वोत्कृष्ट सासरे : विक्रमादित्य – लग्नानंतर होईलच प्रेम
  8. सर्वोत्कृष्ट सासू : मानिनी – लग्नानंतर होईलच प्रेम
  9. सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी : काव्या पार्थ आणि नंदिनी जीवा – लग्नानंतर होईलच प्रेम
  10. सर्वोत्कृष्ट स्टायलिस्ट जोडी : ऊर्जा व शौर्य – वचन दिले तू मला
  11. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा स्त्री : मंजिरी – येड लागलं प्रेमाचं
  12. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा पुरुष : रुद्रप्रताप – नशीबवान
  13. सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – माऊली महाराष्ट्राची
  14. सर्वोत्कृष्ट निवेदक – सिद्धार्थ जाधव आणि साजिरी जोशी
  15. सर्वोत्कृष्ट मुलगी : गिरीजा – ( नशीबवान ) आणि ऊर्जा – ( वचन दिले तू मला )
  16. सर्वोत्कृष्ट भावंडं : हृषिकेश, सौमित्र, सारंग, शर्वरी – घरोघरी मातीच्या चुली
  17. सर्वोत्कृष्ट वडील : अक्षय – मुरांबा
  18. सर्वोत्कृष्ट आई : पूर्वा – वचन दिले तू मला
  19. सर्वोत्कृष्ट धडाकेबाज कलाकार : सत्या – साधी माणसं
  20. सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री : नुपूर – तुझ्या सोबतीने
  21. सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष : मल्हार – तुझ्या सोबतीने

विशेष सन्मान

  • स्टार प्रवाह दैदीप्यमान दुपार – शुभविवाह
  • स्टार प्रवाह दैदीप्यमान दुपार – मुरांबा
  • बालकलाकार : तक्षा शेट्टी व अर्जुन चोघले – मी सावित्रीबाई जोतीराव फुले
  • स्टार प्रवाह विशेष सन्मान – मी सावित्रीबाई जोतीराव फुले

दरम्यान, या सगळ्या विजेत्यांवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.