"मी तुला कधीच विसरु शकणार नाही कारण तू..." ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील किर्तीची 'ती' पोस्ट चर्चेत | Star Pravah Phulala Sugandha Maticha Serial samruddhi kelkar aka kirti share emotional post nrp 97 | Loksatta

“मी तुला कधीच विसरु शकणार नाही कारण तू…” ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील किर्तीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“वैयक्तिक आयुष्यात पण मला तिनं अजाणतेपणी बरंच शिकवलं आहे.”

“मी तुला कधीच विसरु शकणार नाही कारण तू…” ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील किर्तीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
समृद्धी केळकर

छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका कायमच चर्चेत असते. या मालिकेत किर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार घराघरात लोकप्रिय ठरले होते. मात्र हा लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग काही दिवसांपूर्वीच शूट करण्यात आला. त्यानंतर आता अनेक कलाकार या मालिकेला निरोप देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत किर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून समृद्धी केळकरला ओळखले जाते. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे समृद्धीला एक वेगळीच ओळख मिळाली होती. नुकतंच समृद्धीने या मालिकेतील किर्ती या पात्रासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे मालिकेतील अनेक फोटो देखील पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : ‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवघ्या महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं कारण आलं समोर

समृद्धी केळकरची पोस्ट

“किर्ती.. कला , अभिनय क्षेत्रात काम करणार्या प्रत्येक मुलीचा ड्रीम रोल असावा असं हे विविधरंगी पात्र.. विविधरंगी याचसाठी म्हटलं कारण या पात्राला अनेक छटा पैलू आहेत, होते. सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणारी , समंजस , घरातल्यांना आणि बाहेरच्यांनाही समजून सांभाळून घेणारी , नाती जपणारी, स्वप्नपूर्तीचा ध्यास असणारी.. मात्र कोणताही अन्याय सहन न करणारी.. स्वतःचं स्पष्ट मत वेळोवेळी मांडणारी , स्वतःवर पूर्ण विश्वास असणारी अशी ही कीर्ती साकारताना नकळत खऱ्या आयुष्यात पण खूप काही शिकायला मिळालं.

romantic sequence तर मालिकांमधे करायला मिळतातच पण कीर्ती IPS officer असल्यामुळे मालिकेतल्या एका टिपीकल सूनेचं काम करता करता फायटिंग सिक्वेन्स , वेगवेगळ्या physical activities , military training , अगदी बंदूक चालवायला शिकेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी शिकायला,करायला मिळाल्या.

व्यावसायिक आयुष्यात तर मला किर्तीने खूपपपपपप दिलंच आहे. पण वैयक्तिक आयुष्यात पण मला तिनं अजाणतेपणी बरंच शिकवलं आहे. किर्तीचं आत्मविश्वासाने मुद्दे मांडणं , वेगवेळ्या लोकांना त्यांच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे सांभाळून घेणं आणि अवखळ असून देखील वेळ आली की संयमानं वागणं हे मी समृद्धी म्हणून माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील आत्मसात करण्याचा , तसं वागण्याचा प्रयत्न करत आहेच.

किर्ती मी तुला कधीच नाही विसरू शकणार. तू माझ्या हृदयाच्या खूप जवळ होतीस ,आहेस आणि कायम राहशील. थँक्यू यू किर्ती, खूप प्रेम”, असे समृद्धी केळकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

दरम्यान स्टार प्रवाहवरील सर्वात जुनी मालिका म्हणून ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला ओळखले जाते. ही मालिका ‘फुलाला सुगंध मातीचा’ फार कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. मात्र मालिकेचं कथानक बदलताच मालिका कंटाळवाणी होत चालली होती. यामुळे ही मालिकेला ट्रोल केले जातं आहे. त्यानंतर आता अखेर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 16:34 IST
Next Story
‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवघ्या महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं कारण आलं समोर