Sadhi Mansa Fame Actor Akash Nalawade : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे. हा अभिनेता लग्नानंतर तीन वर्षांनी बाबा झाला आहे. आजवर अनेक मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याचं नाव आहे आकाश नलावडे. सध्या तो ‘स्टार प्रवाह’च्या ‘साधी माणसं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
आकाश नलावडेच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालेलं आहे, त्याला मुलगा झाला आहे. ‘It’s Baby Boy’ म्हणत अभिनेत्याने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे. सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून आकाशवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
गेल्यावर्षी ८ सप्टेंबरला ( २०२५ ) म्हणजेच स्वत:च्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने लवकरच बाबा होणार असल्याची गुडन्यूज सर्वांना दिली होती. यानंतर अभिनेत्याने पत्नीचं थाटामाटात डोहाळेजेवण केलं होतं. याचे फोटोही त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
आकाश नलावडेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने २०२२ मध्ये रुचिका धुरीसह साखरपुडा केला. यानंतर १८ मार्च २०२३ रोजी आकाश आणि रुचिका यांनी लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
आकाश नलावडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने यापूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत पश्या ही भूमिका साकारली होती. यानंतर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘साधी माणसं’ मालिकेत त्याला मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री शिवानी बावकर प्रमुख भूमिका सााकारत आहे. ही लोकप्रिय मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाते.
