‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण | Star Pravah Serial Phulala Sugandha Maticha Fame Samruddhi Kelkar share instagram post viral nrp 97 | Loksatta

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

आता लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

phulala sugandh maticha

स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका या चांगल्याच चर्चेत असतात. ‘आई कुठे काय करते’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे काय असतं’, ‘फुलाला सुंगध मातीचा’ या मालिका कायमच प्रेक्षकांचा चर्चेचा विषय ठरलेला असतात. छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत किर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने तिच्या मालिकेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

समृद्धी केळकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात ती आयपीएसच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यावर तिने एकदा शेवटचं असं म्हटलं आहे. यावर तिने स्टार प्रवाह वाहिनीला टॅग केले आहे. त्याबरोबर तिने #किर्ती, #फुलाला सुगंध मातीचा, #प्रेम असे त्यांनी लिहिले आहे. तिच्या या पोस्टनंतर ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान स्टार प्रवाहवरील सर्वात जुनी मालिका म्हणून ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेने पहिल्या पाच मालिकांमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. किर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मात्र आता किर्ती आणि शुभम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका फार कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. मात्र मालिकेचं कथानक बदलताच मालिका कंटाळवाणी होत चालली होती. यामुळे ही मालिकेला ट्रोल केले जातं आहे. त्यातच आता लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-11-2022 at 20:29 IST
Next Story
“आताही त्यांचं नातं….”; शिव ठाकरे-वीणा जगतापच्या रिलेशनबद्दल मराठी बिग बॉस विजेतीचा गौप्यस्फोट