Tuzya Sobatine Serial Launch Date & Time : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘तुझ्या सोबतीने’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची लॉन्चिंग डेट वाहिनीकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली होती. १२ जानेवारीपासून ही मालिका रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती.
मात्र, प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच स्टार प्रवाहने या मालिकेची लॉन्चिंग डेट बदलली आहे. आता या सिरियलचा पहिला भाग १२ जानेवारीऐवजी १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नव्या वेळेनुसार ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका १९ जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित केली जाईल. याबाबत स्टार प्रवाहकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे.
आता ‘तुझ्या सोबतीने’ मालिका सुरू झाल्यावर स्टार प्रवाहची कोणती मालिका निरोप घेणार? याबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. कारण, ९ वाजताच्या प्राइम स्लॉटला आदिनाथ कोठारेची मुख्य भूमिका असलेली ‘नशीबवान’ मालिका प्रसारित होत आहे. आता ‘तुझ्या सोबतीने’ मालिका सुरू झाल्यावर ‘नशीबवान’ मालिकेची वेळ बदलली जाणार का? याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.

‘तुझ्या सोबतीने’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणार अभिनेत्री एतशा संझगिरी. तिच्यासह या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे लोकप्रिय अभिनेता अजिंक्य ननावरे. यामध्ये एतशाच्या ऑनस्क्रीन सासूबाईंच्या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेत्री पूजा नायक झळकणार आहे. यापूर्वी एतशा संझगिरी आणि पूजा नायक या दोघींनी ‘छोटी मालकीण’ मालिकेत एकत्र काम केलं होतं, या मालिकेत सुद्धा दोघींनी ऑनस्क्रीन सासू-सुनेची भूमिका साकारली होती.
याशिवाय ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. माधवी निमकरसह यामध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील आणखी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी सुद्धा या सिरियसमध्ये झळकणार आहे.
