Star Pravah Serial Time Change : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर १९ जानेवारीला ‘तुझ्या सोबतीने’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री एतशा संझगिरी आणि अभिनेता अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. सुरुवातीला या मालिकेला नऊ वाजताचा प्राइम स्लॉट देण्यात आला होता. ही मालिका लॉन्च होण्यापूर्वी रात्री नऊ वाजता प्रसारित होणार होती. पण, त्यानंतर वेळ बदलून ‘तुझ्या सोबतीने’ मालिका रात्री १० वाजता ऑन एअर होईल असं जाहीर करण्यात आलं होतं.

‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका सुरू झाल्यावर जवळपास महिनाभर रात्री १० वाजता प्रसारित करण्यात आली. मात्र, त्यानंतर १६ फेब्रुवारीला पुन्हा एकदा या मालिकेची वेळ बदलून या सिरियलला रात्री ९:३० वाजताचा स्लॉट देण्यात आला. सध्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिका रात्री साडेनऊला तर, ‘वचन दिले तू मला’ ही मालिका रात्री दहा वाजता प्रसारित केली जाते. पण, आता ३० मार्चपासून ‘स्टार प्रवाह’वर मोठा बदल केला जाईल.

३० मार्चपासून ‘स्टार प्रवाह’वर ‘आनंदी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाईल. त्यामुळे ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेची वेळ पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे.

Award Banner

तिसऱ्यांदा वेळ बदलली…

ही वेळ बदलण्याची तिसरी वेळ आहे. आता ३० मार्चपासून एतशा-अजिंक्यची मालिका सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित होईल आणि सध्या सुरू असलेली ‘साधी माणसं’ मालिका २९ मार्चला ऑफ एअर होईल.

नव्या मालिकेची अवघ्या तीन महिन्यांत तिसऱ्यांदा वेळ बदलल्यामुळे प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय २० एप्रिलपासून रात्री १० वाजता ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा ‘वचन दिले तू मला’ या मालिकेचं काय होणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात देखील निर्माण झाला आहे.

दरम्यान, ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, या मध्ये एतशा आणि अजिंक्य यांच्यासह महाराष्ट्राची फेव्हरेट खलनायिका माधवी निमकरची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.