Suchitra Bandekar reveals where she born and brought: ‘आभास हा’, प्यार का दर्द हैं प्यारा प्यारा मीठा मीठा, वहिनीसाहेब, अवंतिका, मनपसंद की शादी, हम पाँच, घर की लक्ष्मी बेटियाँ, पहचान, रणांगण अशा अनेक मालिकांत सुचित्रा बांदेकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, त्या सिनेमांमध्येही विविध धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. त्यांच्या ‘सोहम प्रोडक्शन हाऊस’च्या मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असल्याचे पाहायला मिळते.

त्याबरोबरच सुचित्रा बांदेकर अनेकदा मुलाखतींमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यावेळी त्या त्यांचे लग्न, लव्ह स्टोरी यांबद्दल माहिती देतात. तसेच, पती आदेश बांदेकर, मुलगा सोहम व सून पूजा यांच्याबद्दलही भरभरून बोलताना दिसतात. त्याबरोबरच त्यांना आलेले अनुभव ते वेळोवेळी सांगतात.

नुकतीच सुचित्रा बांदेकर यांनी नुकतीच ‘सोनचाफा प्रॉडक्शन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी १८-१९ व्या वर्षी लग्न करण्याबद्दल वक्तव्य केले. एक काळ असाही होता, जेव्हा पैसे हातात नव्हते, त्यातून ते कसे बाहेर पडले. तसेच, त्यांच्या ‘सोहम प्रॉडक्शन हाऊस’बद्दलही त्यांनी वक्तव्य केले. त्या मूळच्या कुठल्या आहेत, हेही त्यांनी सांगितले.

“लोकांनी गैरसमज करून घेऊ नये…”, सुचित्रा बांदेकर नेमकं काय म्हणाल्या?

सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “लोकांना उगाचाच असं वाटतं की, मी नाशिकची वगैरे आहे. खरं तर माझं नाशिकमध्ये एखाददुसरे लोक ओळखीचे असतील, तेवढेच; बाकी असं कोणीही नाही. पण, मी मुंबईत जन्मले आहे, मुंबईतच वाढले आहे. आणि मी मुंबईचीच आहे. त्यामुळे मी नाशिक किंवा पुण्याची आहे, असा लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. मी मुंबईचीच आहे.”

याच मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. बालमोहन विद्यामंदिरमध्ये शिक्षण घेत असताना तिसरी-चौथीपासून कामाला सुरुवात केली.

दरम्यान, आगामी काळात त्या कोणत्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, आदेश बांदेकर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. ते होम मिनिस्टर या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.