'बिग बॉस १६' फेम अभिनेत्री सुंबूल तौकीर खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मागचे काही दिवस नव्या घरामुळे चर्चेत असणारी सुंबूल सध्या उटीमध्ये आहे. तिथे तिच्यावर माकडाने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. सुंबूलवर माकडाने हल्ला केला असून तिने इन्स्टाग्रामवरून त्याबद्दल माहिती दिली आहे. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा खरंच एकमेकांना डेट करत आहेत? समोर आलं सत्य सुंबूल सध्या तिच्या मित्रांबरोबर उटीमध्ये फिरायला गेली आहे. ती तिथले तिचे सुंदर फोटो शेअर करत आहे. पण उटीमध्ये सुंबुलसोबत एक घटना घडली आहे, त्याबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियावरून चाहत्यांना माहिती दिली. उटीमध्ये प्रवास करत असताना सुंबूलवर माकडाने हल्ला केला. अभिनेत्रीने माकडाच्या हल्ल्याचे काही फोटो शेअर करून याबद्दल सांगितलंय. सुंबूलने शेअर केलेला जखमेचा फोटो 'इमली' स्टार सुंबूल तौकीर खान आणि अभिनेत्री उल्का गुप्ता उटीमध्ये एकत्र सुट्टी एंजॉय करत आहेत, तिथून दोघींनी अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत सुंबुलच्या पायाला झालेली जखम दिसत आहे. या फोटोवर 'द आर्ट' असे लिहिले आहे. तर दुसरा फोटो माकडाचा असून त्यावर 'द आर्टिस्ट' असे लिहिले आहे. या फोटोंसोबत एक पोस्टही आहे. यातूनही सुंबुलने आपल्याला माकडाने चावा घेतल्याचे सांगितले आहे. याशिवाय एक व्हिडीओ देखील आहे ज्यामध्ये सुंबुल आणि उल्का दिसत आहेत. हा व्हिडीओ हॉस्पिटलमध्ये बनवला आहे. सुंबूलने शेअर केलेला माकडाचा फोटो दरम्यान, बिग बॉसमधून बाहेर आल्यावर सुंबूल अनेक इव्हेंट्सना हजेरी लावत आहे. पण ती अद्याप कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. त्यामुळे तिला लवकरच स्क्रीनवर पाहता येईल, अशी आशा तिचे चाहते व्यक्त करत आहेत.