scorecardresearch

“तू काळी आहेस” सुंबूल तौकीरला रंगावरून हिणवलं जायचं; म्हणाली, “फक्त गोरी त्वचा…”

“त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं आणि खूप रडले होते,” असा खुलासा सुंबूलने केला.

sumbul-touqeer-khan
(फोटो – इन्स्टाग्राम)

स्टार प्लसवरील मालिका ‘इमली’मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री सुंबूल तौकीर खान ‘बिग बॉस १६’ मुळे खूप लोकप्रिय झाली. सुंबूलने कमी वयात अनेक सुपरहिट चित्रपट व मालिकांमध्ये काम केलंय. तिचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. अशातच रंगावरून झालेल्या त्रासाबद्दल सुंबूलने खुलासा केला आहे.

“मला मनस्ताप होतो” एमसी स्टॅनवर चिडला अब्दु रोझिक; म्हणाला, “मी त्याला फोन केल्यावर…”

सुंबूल ‘इ-टाइम्स’शी बोलताना म्हणाली, “माझा सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. मी माझ्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली आणि जेव्हाही मी ऑडिशनसाठी जायचे तेव्हा त्यांना फक्त गोरी त्वचा असलेले कलाकार हवे होते. ते खूप अपमानास्पद होते. मला अशा गोष्टी आवडत नाहीत. मला लोकांच्या रंगाचा काही फरक पडत नाही.”

“शो सोडणं हा…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ओंकार भोजनेच्या एक्झिटवर वनिता खरातने मांडलं मत

सुंबूल पुढे म्हणाली, “मला वाटू लागलं की माझा रंग सावळा आहे, त्यामुळे मी लीड हिरोईन बनू शकत नाही. तसं पाहिलं तर सगळ्या नायिका गोऱ्या होत्या. मी कोणाच्याही विरोधात काही बोलत नाही, पण मी यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली होती. पण ‘इमली’ मालिका आल्यावर हा स्टिरिओटाईप मोडला गेला. मला ही मालिका मिळाल्यावर परिस्थिती लगेच बदलली नाही. लोक फोन करून म्हणायचे, कशी मुलगी नायिका म्हणून घेतली आहे, ती काळी आहे. त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं आणि खूप रडले होते, पण प्रीमियरनंतर गोष्टी बदलू लागल्या. शोचा टीआरपी वाढला. मी कशी दिसते हे लोक विसरले, त्यांनी माझं काम पाहिलं, ज्यांना मी आवडत नव्हते, तेही माझी स्तुती करू लागले.”

एसएस राजामौली, राम चरण, ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर एंट्रीसाठी प्रत्येकी २० लाख रुपये दिले? जाणून घ्या सत्य

सुंबूलने आधी ‘इमली’ मालिकेसाठी नकार दिला होता. त्यानंतर निर्मात्यांच्या सांगण्यावरून तिने ऑडिशन क्लिप शेअर केली. ‘इमली’साठी पाठवलेली ऑडिशन क्लिप ही आपली सर्वात वाईट ऑडिशन असल्याचं सुंबूलने सांगितलं. दोन आठवडे कोणताही प्रतिसाद निर्मात्यांनी दिला नव्हता, पण नंतर शूटसाठी बोलावल्याने आश्चर्याचा धक्का बसला होता, असंही सुंबूलने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 10:34 IST

संबंधित बातम्या