‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन तसेच अब्दु रोझिक यांच्यामधील वाद गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. अब्दुने एमसीवर काही आरोप केले आहेत. शिवीगाळ केली तसेच त्याच्या गाडीचे पॅनल तोडलं असे आरोप अब्दुने एमसीवर केले. मात्र हे सगळे आरोप खोटे असल्याचं एमसीच्या टीमने सांगितलं. हा वाद अजूनही सुरूच आहे. आता अब्दु व एमसीच्या वादावर ‘बिग बॉस १६’ स्पर्धक सुम्बुल तौकिर खानने प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा – चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…
‘बिग बॉस’च्या घरात मंडलीमध्ये घट्ट मैत्री जमली होती. साजिद खान, शिव ठाकरे, निमृत कौर, सुम्बुल तौकीर खान, अब्दु रोझिक, एमसी स्टॅन यांच्यामध्ये असलेली मैत्री चर्चेचा विषय ठरली, मात्र घराबाहेर आल्यानंतर एमसी व अब्दुमध्ये एक वेगळाच वाद निर्माण झाला. याविषयी सुम्बुलने सगळं काही ठीक होईल असं म्हटलं आहे.
सुम्बुल म्हणाली, “प्रत्येक नात्यामध्ये चढ-उतार येतात. वेळ ही निघून जाते असं मी प्रत्येकवेळी म्हणते. या दोघांमध्ये खरी मैत्री आहे. मैत्रीमध्ये वाद-विवाद होताच असतात. एमसी व अब्दु प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांच्यामधील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. कित्येक मित्रांमध्ये वाद होतात पण ते वाद कोणालाही दिसत नाहीत”.
“मैत्री आहे. आता भांडणं होत आहेत पण पुढे सगळं काही ठिक होईल. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे लवकरच हा वाद संपेल अशी आशा करुया”. एमसी व अब्दुमधील वाद हा दिवसेंदिवस वाढत आहे. अब्दुच्या टीमकडून मध्यंतरी एक पत्रक जारी करण्यात आलं होतं. या पत्राद्वारे अब्दुने एमसीवर आरोप केले होते. “११ मार्चला अब्दु व स्टॅन दोघेही बंगळूरमध्ये होते. अब्दूने स्टॅनच्या मॅनेजरला त्याच्या कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहून त्याला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, अब्दुबरोबर कॉन्सर्ट करण्यास स्टॅन इच्छुक नसल्याचं त्याच्या मॅनेजरने सांगतिलं. त्यानंतर अब्दुने तिकीट काढून स्टॅनच्या कॉन्सर्टला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. पण स्टॅनने त्याच्या मॅनेजरला अब्दुला बाहेर काढण्याबरोबरच त्याच्या कारचं पॅनल तोडून नुकसान करण्यास सांगितलं”. असं अब्दू म्हणाला. इतकंच नव्हे तर अब्दुने स्टॅनच्या आईबरोबर फोटो न काढल्याने तो नाराज असल्याचं मंडलीमधील इतर सदस्यांनी सांगितलं होतं.