Sumeet Raghavan Video: सध्या अनेक नाटके प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करीत आहेत. त्यामध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या नाटकाचादेखील समावेश आहे. त्यामध्ये सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित प्रमुख भूमिकांत आहेत. त्यांच्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते.
सुमित राघवन हे त्यांच्या मुलाखतीतील वक्तव्यांमुळे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता त्यांचा असाच एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. आता या नवीन व्हिडीओमध्ये नेमके काय आहे आणि सोशल मीडियावर याची चर्चा का रंगली आहे, याबद्दल जाणून घेऊ…
सुमित राघवन यांनी गायलं गाणं
लोकप्रिय अभिनेत्री मनवा नाईकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला मनवा म्हणते, “आता जसा पाऊस पडतोय, तसा सुंदर पाऊस पडत असेल आणि सुमित राघवन गाणं म्हणत असेल, तर अजून काय पाहिजे?” त्यानंतर सुमित राघवन ‘मैतरणी ऐक जरा, काय सांगतो हा वारा…’ या गाण्यातील काही ओळी ते गातात.
हा व्हिडीओ शेअर करताना मनवाने नाईकने सुंदर वातावरण, पाऊस, गाणी आणि मित्र अशी कॅप्शन दिली आहे. मनवाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहते नेमकं काय म्हणालेत, याबद्दल जाणून घेऊ…
एकाने लिहिले, “मला तुम्ही दोघेही प्रचंड आवडता.” दुसऱ्या एकाने लिहिले, “हे एकदमच भारी आहे.” आणखी एकाने लिहिले, “वाह”, एकाने लिहिले, “सुरेख.” आणखी एकाने लिहिले, “सुंदर.” एकाने लिहिले, “सुमीत हुशार माणूस आहे”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहे. तर, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.


सुमित राघवन यांनी आजवर हिंदी-मराठी मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. तसेच, विविध चित्रपटांतील त्यांच्या अनेक भूमिकाही गाजल्या आहेत. त्यांच्या विनोदी भूमिकांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. वागले की दुनिया, साराभाई व्हर्सेस साराभाई, बडी दूर से आये हैं, तू तू मैं मैं अशा अनेक टीव्ही शोजमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे.
दरम्यान, आगामी काळात ते कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
