Tujhi Majhi Jamali Jodi Off Air : छोट्या पडद्यावर येत्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वाहिनीवर सध्या टीआरपी मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळी नवीन मालिका सुरू होतात, त्यावेळी संबंधित वाहिनीवरच्या जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. नुकताच एका लोकप्रिय मालिकेच्या सेटवर शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडला.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा शेवटचा भाग ५ जुलैला प्रसारित होणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका निरोप घेणार असल्याची माहिती प्रत्येकाला आहे. मात्र, याचबरोबर छोट्या पडद्यावरची आणखी मालिका ऑफ एअर होणार आहे. ही मालिका कोणती जाणून घेऊयात…

‘तुझी माझी जमली जोडी’ ही मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जायची. या मालिकेत ‘देवमाणूस’ फेम लोकप्रिय अभिनेत्री अस्मिता देशमुख प्रमुख भूमिका साकारत होती आणि तिच्यासह लोकप्रिय अभिनेता संचित चौधरी प्रमुख भूमिकेत झळकत होता.

संचितने यापूर्वी ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’, ‘असे हे सुंदर आमचे घर’ अशा मालिकांमध्ये देखील काम केलेलं आहे. अस्मिता व संचित या दोघांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या दोघांनी सेटवरच्या शेवटच्या दिवसाची झलक इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

संचितने “समाप्त…” असं लिहिलेला स्क्रिप्टचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “आणि हा प्रवास संपला” असं म्हटलं आहे. याशिवाय अस्मिताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये शूटिंगच्या शेवटच्या दिवसाची झलक पाहायला मिळत आहे. “It’s a wrap… हा प्रवास खूप सुंदर होता” असं कॅप्शन देत मालिकेच्या टीमने सर्वांचा निरोप घेतला आहे. शेवटच्या दिवशी सगळेच कलाकार भावुक झाले होते. ही मालिका डिसेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि आता दीड वर्षांनी लवकरच ऑफ एअर होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेच्या सेटवर शूटिंगचा शेवटचा दिवस नुकताच पार पडला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुद्धा भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मालिका संपवून चुकीचा निर्णय घेतला असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. आता यामधील कलाकारांना कमेंट्समध्ये त्यांच्या चाहत्यांनी पुढील प्रोजेक्टसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.