‘कलर्स मराठी’वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका बरीच गाजली. वेगळ्या धाटणीच्या विषयावर आधारित असलेल्या या मालिकेने अल्पवधीच प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. या मालिकेत अक्षया नाईक आणि समीर परांजपे यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र काही महिन्यापूर्वीच समीरने ही मालिका सोडली होती. त्यानंतर आता एका अभिनेत्रीने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती सोशल मीडियावरुन तिने शेअर केली आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचं कथानक हे लतिका या पात्राच्या भोवताली फिरतं. ही भूमिका अभिनेत्री अक्षया नाईकने साकारली आहे. मात्र त्यासोबत आणखी एका अभिनेत्रीने या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ती म्हणजे अभ्याची मैत्रीण नंदिनी. नंदिनी लतिकाला नेहमीच साथ देताना दिसते. मालिकेत नंदिनी हे पात्र अभिनेत्री अदिती द्रविडने साकारलं आहे. पण आता नंदिनी या पात्राची मालिकेतून एक्झिट होणार आहे.
आणखी वाचा-Video : लतिका शूटिंगसाठी ट्रक चालवायला गेली अन्…; ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री अदिती द्रविडने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिलं, “मित्रांनो, ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधून नंदिनीला निरोप देत आहे. बाय बाय नाशिक, इथल्या कामाचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्ही दिलेल्या अमुल्य आठवणी, चांगला वेळ आणि अप्रतिम माणसं यासाठी धन्यवाद. लवकरच भेटूयात नवीन रुपात. तोपर्यंत तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद इन्स्टाग्राम फॅमिली. तुम्ही सगळे माझ्यासाठी माझं जग आहात.”
आणखी वाचा-“मुंबईच्या ज्या रस्त्यांवरून आजपर्यंत…” अदिती द्रविड रमली जुन्या आठवणीत
अदिती द्रविडने या पोस्टसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने मालिकेला सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंतच्या आठवणी फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात आहेत. अदितीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्थात अदितीने ही मालिका का सोडली? यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.