scorecardresearch

Premium

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील अभिमन्युचं अशोक सराफ यांनी केलं कौतुक, अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “अभिमानाचा क्षण…”

अशोक सराफ अभिनेत्याला पाहताच क्षणी काय म्हणाले? जाणून घ्या…

sundara manamadhe bharli fame sameer paranjape share special moments with ashok saraf Nivedita Saraf
अशोक सराफ अभिनेत्याला पाहताच क्षणी काय म्हणाले? जाणून घ्या…

काही महिन्यांपूर्वीच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण मालिकेतील कलाकार आजही चर्चेत असतात. सध्या या मालिकेतील अभिमन्यु म्हणजे अभिनेता समीर परांजपे ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या नव्या पर्वातून आपल्या आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकत आहे. नुकतीच या कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी समीरचं कौतुक केलं. याचा अनुभव अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेता समीर परांजपेने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो स्वतः दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो अशोक सराफ आणि निवेदिता यांच्याबरोबर पाहायला मिळत आहेत. तसेच तिसऱ्या फोटोमध्ये समीर गुरुंबरोबर दिसत आणि चौथ्या फोटोमध्ये वीणा आहे. पाचव्या फोटोमध्ये नाना पाटेकर यांच्या पत्नी अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांनी केलेलं त्याच्या कौतुकाचे मेसेज पाहायला मिळत आहेत.

Pooja bhatt birthday special hero Bollywood film industry journey
Pooja Bhatt: वडिलांशी लिपलॉक ते न्यूड फोटोशूट! अशी आहे बॉलिवूडच्या ‘बॉम्बे बेगम’ची गोष्ट
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
yavatmal aarchi tigress marathi news, tipeshwar wildlife sanctuary marathi news, aarchi tigress yavatmal marathi news
VIDEO : ‘आर्ची’ कुटुंबकबिल्यासह दिसताच पर्यटक सैराट, टिपेश्वरच्या जंगलात झिंग झिंग झिंगाट!!!
rajat-kapoor
चित्रपटसृष्टीतील बड्या सेलिब्रिटीजच्या गर्दीत हरवलेला पण, आपल्या कलेतून प्रेक्षकांना समृद्ध करणारा अवलिया ‘कपूर’

हेही वाचा – करिअरच्या शिखरावर असताना माधुरी दीक्षितने श्रीराम नेनेशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक होण्याचा का घेतला निर्णय? अभिनेत्री म्हणाली…

समीरने हे पाच फोटो शेअर करत लिहिलं आहे, “आजचा एपिसोड आजचं गाणं माझ्या आयुष्यातला तो क्षण आहे जो आयुष्यभर कायम आत्तरासारखा मनात दरवळत राहील आणि मला कायम विचारत राहील, गाणं करतोयस ना? शूटींग सुरू झालं अशोक मामांची, निवेदिता ताईंची एन्ट्री झाली आणि मला बघून अशोक मामा म्हणाले अरे तू गातोस? मला वाटलं छान अभिनयच करतोस फक्त…मी पाहिलंय तुझं काम…छान करतोस काम…ते मला ओळखतात त्यांनी माझं काम पाहिलंय हा माझ्यासाठी अभिनेता म्हणून अभिमानाचा क्षण होता…हो अभिमानच..गर्व म्हणा हवं तर…आणि का नसावा? रविवारी दुपारी ४ वाजता दूरदर्शनवर लागणाऱ्या यांचे चित्रपट बघत मोठे झालो. आज पहिल्यांदा ते भेटतात आणि हे बोलतात अजून काय हवं एखाद्या नवीन अभिनेत्याला…”

पुढे अभिनेत्याने लिहिलं, “या एपिसोडला गाणं ही ते मिळावं जे मला माझ्या गुरुंनी जवळपास २० वर्षांपूर्वी शिकवलं होतं…प्रोमो बघून नीलूताईंचा आशीर्वादरुपी मेसेज यावा @neelkantipatekar कृतज्ञता, रितेपण आणि वनवास संपल्याचा आनंद हे सगळं जगलोय मी…एपिसोड बघा आणि एक आशीर्वाद नक्की द्या..’जीते रहो गाते रहो’”

हेही वाचा – “अत्यंत हीन दर्जाच्या…”, बॉडी शेमिंग करणाऱ्यांना केतकी माटेगावकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “तुम्हाला सुद्धा घरात बहिणी, आई…”

दरम्यान, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेतील समीरने साकारलेला अभिमन्यु प्रेक्षकांच्या चांगलांच पसंतीस पडला होता. तसेच याआधी ‘गोठ’ मालिकेत त्याने साकारलेली विलास ही भूमिका देखील गाजली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sundara manamadhe bharli fame sameer paranjape share special moments with ashok saraf nivedita saraf pps

First published on: 04-12-2023 at 07:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×