scorecardresearch

बॉलिवूडमधील ‘या’ सुप्रसिद्ध गायिकेने गायलं झी मराठीच्या नवीन मालिकेचं शीर्षकगीत, व्हिडीओ व्हायरल

‘चंद्रविलास’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

sunidhi chauhan chandravilas title track
'चंद्रविलास' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘रात्रीस खेळ चाले’, ‘ग्रहण’, ‘असंभव’, ‘ती परत आलीये’ या झी मराठी वाहिनीवरील भयकथा असलेल्या मालिका गाजल्या. आता पुन्हा एक हॉरर मालिका झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘चंद्रविलास’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना भयकथेचा थरार छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

भयकथेप्रमाणेच झी मराठीच्या अनेक मालिकांची शीर्षकगीते लोकप्रिय ठरली आहेत. ‘चंद्रविलास’ मालिकेचं शीर्षकगीतही प्रदर्शित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक सुनिधी चौहाणने ‘चंद्रविलास’ मालिकेचं गीत गायलं आहे. झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> आकांक्षा दुबे समर सिंहबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होती? अभिनेत्रीच्या निधनानंतर कुटुंबियांचा खुलासा, म्हणाले “तो तिच्या…”

‘चंद्रविलास’ मालिकेचं शीर्षकगीत अमोल पाठारे यांनी लिहिलं असून प्रणव हरिदास यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. हे गीत गातानाचा सुनिधी चौहाणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> पडद्यावर भुताची भूमिका साकारणाऱ्या वैभव मांगलेंना खऱ्या आयुष्यात भयपटांची वाटते भीती, कारण सांगत म्हणाले…

‘चंद्रविलास’ मालिका आजपासून (२७ मार्च) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेत अभिनेता वैभव मांगले भूताच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर सागर देशमुख व आभा बोडस हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 16:51 IST

संबंधित बातम्या