Premium

सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल होणार पुन्हा सुरू! दोन महिन्यांपासून होतं बंद, अभिनेत्री म्हणाल्या, “आम्ही…”

लेकाच्या हॉटेलबद्दल सुप्रिया पाठारेंनी दिली माहिती; पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

supriya pathare maharaj hotel reopening from tomorrow
सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल पुन्हा सुरू होणार

लोकप्रिय मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अभिनेत्री सुप्रिया पाठारे नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. त्यांच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनयाव्यतिरिक्त सुप्रिया पाठारे त्यांच्या मुलाला हॉटेल व्यवसायात मदत करतात. त्यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफेशनल शेफ असून गेल्यावर्षी परदेशात प्रसिद्ध असणारी फूड ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फूड ट्रकच्या व्यवसायात यश मिळल्यानंतर मिहिरने काही महिन्यांपूर्वी ठाण्यात ‘महाराज’ हॉटेल सुरू केलं होतं. मात्र, सुप्रिया पाठारे यांना मातृशोक झाल्याने त्यांनी मध्यंतरी काही दिवस त्यांचं हॉटेल बंद ठेवलं. पुढे काही वैयक्तिक अडचणींमुळे त्यांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच लवकरात लवकर आम्ही खवय्यांच्या सेवेत पुन्हा येऊ असंही अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. अखेर दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रिया पाठारे यांनी पुन्हा एकदा हॉटेल सुरू होत असल्याचं जाहीर केलं आहे.

हेही वाचा : वडिलांचा विरोध पत्करून निशी मुंबईला जाणार का? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार रंजक वळण, पाहा प्रोमो

“दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘महाराज’ पुन्हा सुरू होतं. उद्या ८ तारखेपासून आम्ही पुन्हा एकदा खवय्यांच्या सेवेत सज्ज आहोत. ‘महाराज’ सुरू होतंय…त्यामुळे नक्की भेट द्या, खेवरा सर्कल, काशिनाथ घाणेकर नाट्यगृहच्या पुढच्या चौकात, रामजी हॉटेलच्या समोर” अशी पोस्ट शेअर करत सुप्रिया यांनी हॉटेल पुन्हा सुरू होत असल्याचं जाहीर केलं आहे.

हेही वाचा : पियुष रानडेशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? सुरुची अडारकर म्हणाली, “तो माणूस म्हणून…”

दरम्यान, सुप्रिया पाठारेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्या महत्त्वाची भूमिका साकारत असलेल्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी सुप्रिया यांच्या महाराज हॉटेलला भेट देत या मायलेकांचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya pathare maharaj hotel reopening from tomorrow actress shares new update sva 00

First published on: 07-12-2023 at 12:51 IST
Next Story
शुभमंगल सावधान! मुग्धा वैशंपायनची बहीण मृदुल अडकली लग्नबंधनात; पारंपारिक लूकने वेधलं लक्ष