Suraj Chavan Bigg Boss Marathi Five Winner : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण याचं राज्यभरात कौतुक होतं आहे. राज्यभरातल्या कलाकारांकडून त्याचं कौतुक केलं जातं आहे. बिग बॉसचा पाचवा सिझन सूरज जिंकेल अशी चर्चा होती. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर त्याचा गुलिगत धोका आणि झापूकझुपूक ट्रेंडचं कौतुक होतं आहे. यानंतर सूरज चव्हाणला ( Suraj Chavan ) एक्स गर्लफ्रेंड परत आली तर तिला स्वीकारणार का? हा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

सूरज चव्हाण काय म्हणाला?

“माझ्या गावात लय डिजे लागले आहेत, ते वाट बघत आहेत की कधी आमचा सूरजभाऊ ( Suraj Chavan ) येतोय आणि आम्ही कधी त्याला खांद्यावर घेऊन नाचवतोय. बिग बॉसचं घर मी बांधणार आहे. माझे आई वडील म्हणजे बिग बॉस होते. मला नीट बोलायला येत नव्हतं. घनश्याम म्हणतोय तुझं लग्न असल्यावर आम्ही किती दिवस राहायला येऊ तर मी त्याला म्हटलं तू कितीही दिवस ये. तुझंच घर आहे”, असं सूरज म्हणाला.

Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
genelia and riteish deshmukh invited suraj chavan to their home
रितेश भाऊ अन् जिनिलीया वहिनींकडून खास निमंत्रण! सूरज चव्हाण देशमुखांच्या घरी केव्हा जाणार? म्हणाला, “ते देवमाणूस…”

हे पण वाचा- पॅडी दादांच्या हातात ट्रॉफी दिली, मिठी मारली अन्…; सूरज-पंढरीनाथचे ‘ते’ फोटो पाहून नेटकरी भावुक, म्हणाले, “दोन खरी माणसं…”

एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?

“बच्चाला आत्ता बच्चा झाला आहे. आता कसं करु ? बच्चाला बच्चा झाला आहे. आता नाही करु शकत. नवीन एखादं पिलू बघायचं. साधं, सिंपल. एक नंबर माझं पिलू. माझा कॉस्ट्युम माझ्या ताईने बनवला. मी उठून दिसण्यासाठी हा पॅटर्न तयार केलाय. सगळे डायलॉग माझ्या शर्ट पँटवर लिहिले आहेत. असा शर्ट पँट मला तयार करुन आणला म्हणून मला आनंद झाला आहे.” सूरजने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख बिग बॉसच्या शोमध्ये अनेकदा केला होता. तो तिला बच्चा इतकंच म्हणत होता. ती कोण आहे ते समजू शकलेलं नाही. पण आता तिला स्वीकारणार नाही कारण तिचं लग्न होऊन तिला मूल झालं आहे असं सूरज चव्हाणने ( Suraj Chavan ) म्हटलंय.

मी कुणालाही भीत नाही

“माझी बॉडी नसली तरीही मी कुणाला भीत नाही. भावा, मी कुणाला आवरत नाही. एकदा घुसलो की घुसलो. मी भीत नसतो. तिकडे काय व्हायचं की आम्ही लय जण होतो, इकडे अरबाज, वैभव सगळे होते. मला आमच्या टीमचा राग यायचा. त्यांची टीम हलकी आहे, मग मला बिग बॉसने या टीमला का टाकलं असं वाटायचं. वजनदार कुणी नव्हतं असं मला वाटायचं. माझ्या आई वडिलांची मला आठवण येते आहे. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकलो आहे.” असं सूरजने ( Suraj Chavan ) म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी त्याने संवाद साधला. त्यावेळी त्याने हे वक्तव्य केलं आहे.