Suraj Chavan Bigg Boss Winner KGF Bike : प्रत्येकाच्या आयुष्यातील काही गोष्टी खूपच खास असतात अगदी त्याचप्रमाणे ‘बिग बॉस मराठी – ५’ या शोच्या विजेत्या सूरज चव्हाणच्या आयुष्यात देखील एका बाईकला विशेष महत्त्व आहे. सूरजची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नाहीये. अत्यंत हालाखीच्या स्थितीत त्याचं बालपण गेलंय. आई-वडिलांचं छत्र हरपल्याने त्याच्या बहि‍णींनी त्याचा सांभाळ केलाय. पण, एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून सूरजने आज एवढं मोठं यश मिळवलं आहे. आज तो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका झाला आहे.

आजच्या घडीला सूरजला महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळते. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर सध्या त्याचे चाहते व टिकाकार लक्ष ठेवून आहेत. घरात बेताची परिस्थिती असताना त्याच्याकडे एवढी महागडी बाईक कशी काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. यावर या ‘गुलीगत किंग’ने ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

हेही वाचा : Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी

सूरज चव्हाणच्या आवडत्या बाईकबद्दल जाणून घ्या…

सूरज ( Suraj Chavan ) या गाडीबद्दल म्हणाला, “ही गाडी मला माझ्या मित्राने भेट दिलीये. मी घेतलेली नाही… विशाल खोमणे असं माझ्या मित्राचं नाव आहे. माझ्यावरच्या प्रेमापोटी त्याने ही गाडी मला गिफ्ट केली होती. याच गाडीमुळे मी सर्वत्र व्हायरल झालो. ही गाडी अशीये की…मी दूरवर असलो तरीही सर्वांना फक्त आवाजाने समजतं की मी घरी आलोय किंवा येतोय.”

“ही गाडी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण, ही माझी लक्ष्मी आहे. या गाडीमुळे मी इन्स्टाला प्रचंड गाजलो. पुढे, कितीही गाड्या आल्या तरी, ही गाडी मी कायम माझ्याजवळ ठेवणार… ही बाईक माझ्या अत्यंत जवळची आहे. त्यामुळे ही KGF कायम माझ्याबरोबर असेल.” असं सूरजने सांगितलं.

हेही वाचा : ‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…

हेही वाचा : मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”

सूरजने ( Suraj Chavan ) त्याच्या या बाईकचं नाव KGF असं ठेवलं आहे. दरम्यान, आता ‘बिग बॉस’ शो संपला जरी असला तरीही सूरजबद्दल प्रेक्षकांच्या मनात लोकप्रियता कायम आहे. आता लवकरच तो केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याला रुपेरी पडद्यावर प्रमुख भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

Story img Loader