Suraj Chavan Wife Maternity Photoshoot : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण हा लवकरच वडील होणार आहे. सूरजची बायको संजना चव्हाण हिने आनंदाची बातमी दिली असून लवकरच ती आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी संजनाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला होता. यावेळी संजनाच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. भावाच्या या आनंद सोहळ्यामध्ये अभिनेत्री जान्हवी किल्लेकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. यानंतर आता संजनाने गरोदरपणातील फोटोशूट केले आहे. डिझानर गाऊनमधील तिच्या खास फोटोशूटचा व्हिडीओ समोर आला आहे.

गरोदरपण हे प्रत्येक स्त्रीसाठी अनेकदा आनंद सोहळा असतो. नव्या बाळाची चाहूल लागताच या चिमुकल्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी पालकांसह संपूर्ण कुटुंब मोठे उत्सुक असते. सूरज चव्हाण आणि त्याचे कुटुंबही मोठ्या उत्साहाने संजनाचे गरोदरपणातील लाड पुरवत आहेत. हा क्षण कायमचा जपून ठेवण्यासाठी अनेक जण मॅटर्निटी फोटोशूट करतात. संजना चव्हाण हिनेदेखील हे गरोदरपणातील खास फोटोशूट केले आहे. ‘मेकओव्हर बाय आदी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. डिझायनर अशा गुलाबी गाऊनमध्ये संजनाने हे फोटोशूट केले. सोशल मीडियावर या फोटोशूटचे व्हिडीओ व्हायरल होत असून सूरजच्या चाहत्यांनी यावर शुभेच्छा दिल्या आहेत.

सूरज चव्हाणची बायको असलेल्या संजना चव्हाणने विविध थीम्समध्ये फोटोशूट केले आहे. पारंपरिक साडीमध्ये आणि वेस्टर्न गाऊनवर अशा दोन्ही पद्धतीने तिने फोटोशूट केले आहे. फुलांची उधळण करत तिने खास पोज दिल्या आहेत. बेबी बंप फ्लॉन्ट करत संजनाने खास फोटोशूट केले. यावेळी तिने बेबी बंपवर हार्ट दाखवून आणि चाफ्याच्या फुलांचा सुगंध घेत विविध पोज दिल्या आहेत. संजना चव्हाणचे हे मॅटर्निटी फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.

फोटोशूटवेळी संजनाने लाँग टेल स्टाईल फ्रिल असलेल्या डिझायनर गाऊन परिधान केला आहे. व्ही नेक असलेल्या गाऊनवर फक्त तीन डायमंडची डिझाईन आहे. गुलाबी रंगाच्या या गाऊनमध्ये तिचे सौंदर्य खुलले आहे. वेव्ही स्टाईलने हेअरस्टाईल करून तिने केस मोकळे सोडले आहेत. डोक्यावर तिने खास फुलांचा मुकूट परिधान केला आहे. गुलाबी व पांढऱ्या रंगाचा हा ‘फ्लॉवर क्राउन’ संजनावर उठून दिसत आहे. हातामध्ये डायमंड घड्याळासह तिने गळ्यामध्ये फक्त मंगळसूत्र घातले आहे. मिनिमल ज्वेलरी आणि हेवी मेकअपसह संजनाने लूक पूर्ण केला आहे. तसेच संजनाच्या हातावर ‘माँ’ लिहिलेली खास मेंदीदेखील काढली आहे.

काही दिवसांपूर्वी संजनाच्या ओटी भरणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्याच्या या आनंदामध्ये जान्हवी किल्लेकर सहभागी झाली होती. बारामतीमध्ये मोठ्या उत्साहात संंजनाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात संजनाने डिझायनर हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तसेच सूरजने ऑफ व्हाइट शेरवानी स्टाईल केली होती. देवांच्या फोटोसह असलेले डिझायनर आऊटफिट त्यांनी खास स्टाईल केले होते.

    सूरज चव्हाण-संजनाचे लव्ह मॅरेज

    सूरज चव्हाण हा लोकप्रिय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर असून त्याच्या पत्नीचं नाव संजना गोफणे आहे. संजना ही सूरजच्या चुलत मामांची मुलगी असून त्या दोघांचे लव्ह मॅरेज झाले आहे. या दोघांचा विवाहसोहळा नोव्हेंबर २०२५ मध्ये बारामतीला पार पडला होता. सूरज-संजना या दोघांच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील यांच्यासह काही राजकीय मान्यवरदेखील उपस्थित होते. आता लवकरच सूरजच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन होणार आहे.