मनोरंजन सृष्टीतील कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट, तर कधी मुलाखतीदरम्यान केलेली वक्तव्ये यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री सुरेखा कुडची(Surekha Kudachi) यांनी एका मुलाखतीदरम्यान मुला-मुलींच्या लग्नाबाबत वाढत चाललेल्या अपेक्षा यावर वक्तव्य केले आहे. याबरोबरच, त्यांनी स्वत:चे उदाहरणदेखील देखील आहे.

काय म्हणाल्या सुरेखा कुडची?

अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नुकतीच सेलिब्रिटी कट्टाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना मुला-मुलींच्या लग्नाबाबतच्या अपेक्षा वाढत चालल्या असून त्यावर त्यांना काय वाटते? असा प्रश्न त्यांना विचारला. यावर बोलताना सुरेखा कुडचींनी म्हटले, “फार दूरचं नको.माझंसुद्धा लग्न फार उशिरा झालं. त्यावेळी मला असं वाटत होतं की या इंडस्ट्रीमधलं कोणी नको. बाहेरचं कोणी असेल तर लग्न करेन. स्थळं येत होती. पण, लोकांच्यादृष्टीने फिल्म इंडस्ट्री वाईटच असं बोललं जातं. तेव्हा असं झालं की तुम्ही हे क्षेत्र सोडा. बाकी सगळं छान आहे, तालेवार घराणं, घरासमोर गाड्या, घरात बसून तुम्हाला काय हवं नको ते मिळेल, असं लोकांना वाटायचं. माझं असं होतं की यासाठी इतके कष्ट घेऊन इथंपर्यंत आलो का? माझी स्वत:ची एक वेगळी ओळख असेल तर मला काम करू दे. बरं मी फार अशा वेगळ्या, फार विचित्र भूमिका करत नसे. माझ्या वाट्याला आलेल्या भूमिका साधारण एक लग्न झालेली बाई, आई, सासू अशा असत.”

zee marathi lakshmi niwas jahnavi shocked after seen jayant real face
लक्ष्मी निवास : लग्नानंतर दिसलं जयंतचं वेगळंच रुप! ‘ती’ घटना पाहून जान्हवीला बसला धक्का; नेटकरी म्हणाले, “आधीच माहिती होतं…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Woman with baby in babys belly gives birth safely
‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
marathi singer vaishali samant
“मराठी कलाकारांना PF नाही, पेन्शन नाही…”, वैशाली सामंतने खंत व्यक्त करत केली ‘ही’ मागणी, म्हणाली…
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding actress reacts on trolling
“पियुष माणूस म्हणून कोणापर्यंतच पोहोचलेला नाही” लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर; म्हणाली, “त्याचा भूतकाळ हा…”

“मला कधीच कॉलेजची मुलगी वैगेर अशा भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे मला असं झालं की लोक मला का हे सांगत आहेत? तिशीनंतर मी लग्न केलं. माझे वडील मला तेव्हा म्हणाले होते की तुला तुझ्या क्षेत्रातलं कोणीतरी पाहावं लागेल, त्याशिवाय हे होणार नाही. शेवटी नशिबात जे लिहिलेलं असतं तेच होतं. माझा नवरा कॅमेरामन होता. शूटिंगदरम्यान आमचं जुळलं. त्यामुळे मला वाटतं की खूप अपेक्षा ठेवल्या की उशिरा लग्न होतात आणि बऱ्याच गोष्टी असतात. मग मुलं उशिरा होतात. माझी आता पन्नाशीकडे वाटचाल सुरूय. माझी मुलगी आता दहावीला जाणार. हे गणित चुकतं. मी माझ्या मुलीलाही सांगितलंय की वेळेतच लग्न होणं गरजेचं आहे, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. त्यामुळे फार अपेक्षा ठेऊ नयेत. काही चांगल्या अपेक्षा ठेवल्याच पाहिजेच पण जास्त ठेवल्या, लग्नच नाही झालं. किंवा लग्न झालं आणि मूलच नाही झालं तर मग त्या लग्नाला काय अर्थ आहे. “

हेही वाचा: श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

पुढे बोलताना सुरेखा कुडचींनी म्हटले, “बऱ्याच मुलींना हल्ली मूल नको असतं. जबाबादारी झटकवून देणाऱ्या असतात. हे मला पटत नाही.शेवटी आजच्या पीढीचा तो विचार आहे. मुलांची जबाबादारी नको. हा एक मोठा प्रश्न आहे. का मूल नकोय? मला असं वाटतं एक तरी मूल असणं, गरजेचं आहे. ज्याच्यासाठी घरी जाण्याची एक ओढ असते. उतरत्या वयात कोणीतरी असतं, आपल्याला सांभाळेल. जोपर्यंत हात-पाय चाललेत, तोपर्यंत आपण छान कामात बिझी असतो. पण उतरत्या वयात कोणीतरी सांभाळण्याची गरज असते. सांभाळण्यासाठी म्हणून नाही, तर एक ओढ असते म्हणून मूल असावं, असं मला वाटतं”, अशा शब्दात सुरेखा कुडचींनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, सुरेखा कुडची बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. अभिनयाबरोबरच, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळते.

Story img Loader