कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यामध्ये अनेकांना अधिक रस असतो. काही कलाकार मंडळी आपल्या आयुष्याबाबत खुलेपणाने बोलताना दिसतात. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे सुयश टिळक. सुयशने मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठीमधील या प्रसिद्ध अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अक्षया देवधरबाबत भाष्य केलं आहे. सुयश व अक्षया काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांनी समजुतदारीने एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या आयुष्यामध्ये दुसरीच कोणीतरी व्यक्ती आली आहे हे तिने त्यावेळी सुयशला सांगितलं. त्यानंतर हे दोघं एकमेकांपासून विभक्त झाले. ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘त्या नंतर सगळं बदललं’ या कार्यक्रमात सुयशने याबाबत भाष्य केलं. आणखी वाचा - “तिच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आलं आणि…” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत सुयश टिळकचं भाष्य, म्हणाला, “आजही आमच्यामध्ये…” शिवाय ब्रेकअपनंतर सुयशच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम झाला होता. याबाबत तो म्हणाला, "आपली माणसं जेव्हा आपल्यापासून दूर जातात तेव्हा त्या परिस्थितीला सामोरं जाणं कठीण असतं. ब्रेकअपनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा स्वीकार करणं माझ्यासाठी अवघड होतं. माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता. मी त्यावेळी खूप वेडेचाळे केले आहेत. कुठेतरी मी एकटाच निघून जायचो. पुढचे काही दिवस मी एका ठिकाणी निघून जाणार आहे असं फक्त माझ्या जवळच्या माणसांनाच सांगायचो". आणखी वाचा - “माझा उजवा डोळा गेला अन्…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा ‘त्या’ भीषण अपघाताबाबत खुलासा, म्हणाला, “चेहऱ्यावर जखमा…” "दरम्यान मी फोनही बंद ठेवत होतो. मी काम करणंही कमी केलं होतं. खूप काम करत नव्हतो. कारण मला काम करताच येत नव्हतं. जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या खचता तेव्हा तुम्ही जे पात्र साकारत असता ते उत्तम पद्धतीने करू शकत नाही. त्यादरम्यान मी स्वतःला वेळ दिला. त्याकाळात मी खूप फिरलो. बऱ्याच सोलो ट्रीपही केल्या. माणूस म्हणून मी स्वतःला सुधारण्याची संधी दिली. वाचनाकडे माझा कल खूप वाढला". सुयशच्या खासगी आयुष्याचा त्याच्या कामावरही परिणाम झाला हे त्याच्या बोलण्यामधून दिसून आलं.