scorecardresearch

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मोठा झटका, वाचा नेमकं कारण काय?

हा कार्यक्रम संपणार अशा बातम्याही यायला लागल्या आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
तारक मेहता का उल्टा चष्मा

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. गेल्या १४ वर्षांपासून असलेल्या या मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदा यांनी काही महिन्यांपूर्वी हा कार्यक्रम सोडला. त्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता मालव राजदा यांनी एका नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात होतं. हा कार्यक्रम संपणार अशा बातम्याही यायला लागल्या आहेत. त्यातच आता मालव राजदा यांनी त्यांच्या नवीन मालिकेबद्दलची घोषणा केली होती. त्याचा एक प्रोमोही त्यांनी शेअर केला होता.

मालव राजदा हे लवकरच ‘प्रोफेसर पांडे के पांच परिवार’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा एक कॉमेडी शो असणार आहे. त्याचा प्रोमो व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या कार्यक्रमात अभिनेता संदीप आनंद हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या कलाकारांसह जय पाठक, सोनू चंद्रपाल, जयश्री सोनी, सोनिया कौर, मधुश्री शर्मा आणि प्रभा कौर हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत.

दरम्यान या कार्यक्रमामुळे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, असं म्हटलं जात आहे. या मालिकेतील अनेक कलाकार एक एक करून मालिकेला राम राम करत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आणि मालव राजदा यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये वाद झाला. त्यानंतर राजदांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, असं बोललं जात आहे. पण त्यांनी याबद्दल स्पष्टपणे भाष्य केले होते.

“मी तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली आहे. गेल्या १४ वर्षांपासून मी या मालिकेत काम करत आहे. त्यामुळे एक कम्फर्ट झोन तयार झाला आहे. मला असं वाटतंय की, रचनात्मक रुपात पुढे जाण्यासाठी मालिका सोडून स्वत:ला आव्हान दिलं पाहिजे” असंही मालव राजदा यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 15:31 IST