तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमधून आत्माराम तुकाराम भिडे हे पात्र घराघरांत पोहोचलं. भिडे सरांचं हे पात्र साकारणारा अभिनेता म्हणजेच मंदार चांदवडकर. मंदार अनेकदा सेटवरील धमाल मस्ती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकताच त्याने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

आज लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडत आहे. महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. अनेक जण आपला हक्क बजावत मतदान क्रेंदावर जाऊन आपलं अमूल्य मत देत आहेत. गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे म्हणजेच मंदार चांदवडकर यानेही त्याचा मतदानाचा हक्क बजावला आहे.

हेही वाचा… “आडनाव जोग आणि काटा काढता येत नाही”, बाळासाहेब ठाकरे यांचा ‘तो’ किस्सा सांगत अनंत जोग म्हणाले…

सामान्य नागरिकांसह मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मत देऊन त्यांचा अधिकार बजावत आहेत. मंदार चांदवडकर यानेसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी त्याचं मत दिलं. मत देऊन आल्यानंतर मंदार चांदवडकरने सोशल मीडियावर त्याच्या हटके अंदाजात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मंदार शाईने रंगवलेलं बोट दाखवतं आहे आणि सगळ्यांना वोट करण्याची विनंती करत आहे. मंदारने या व्हिडीओत म्हटलं की, “दोस्तो क्या आपने अपना धर्म निभाया नही, तो जाईये और वोट किजिए.”

मंदार चांदवडकरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओला मंदार चांदवडकरने कॅप्शनदेखील दिलं आहे. या कॅप्शनमध्ये “मतदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कृपया तुमच्यासाठी मतदान करा. शेवटी योग्य उमेदवार निवडून दिल्याने तुमचाच फायदा होणार आहे,” असं मंदारने लिहिलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

हेही वाचा… “सायली अर्जुनच्या प्रेमात पडली”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली…

एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “हो भिडे सर आम्ही वोट देऊ”, तर दुसऱ्याने लिहिले, “भिडे सर तुम्ही नोटीस बोर्डवर सुविचार लिहा, तोच तुमचा धर्म आहे.” एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सगळ्यांनी भिडे सरांचं ऐका बरं का…”

हेही वाचा… “२५० रुपयांचं पाकीट…”, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला बक्षिस म्हणून शर्मिष्ठा राऊतने दिली पहिली कमाई, म्हणाली…

दरम्यान, ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेद्वारे मंदार चांदवडकर अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या मालिकेत दिलीप जोशी, सचिन श्रॉफ, सुनयना फोजदार, तनुज महाशब्दे, मुनमुन दत्ता, सोनालिका जोशी, श्याम पाठक अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.