scorecardresearch

Video : ‘तारक मेहता..’मधल्या ‘माधवी भाभी’च्या नवऱ्याला पाहिलंत का? अगदी साध्या पद्धतीने केलं होतं लग्न

सोनालिका जोशीचा सुखाचा संसार, नवऱ्याबरोबरचे फोटो व व्हिडीओ पाहिलेत का?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, taarak mehta Sonalika Joshi
सोनालिका जोशीचा सुखाचा संसार, नवऱ्याबरोबरचे फोटो व व्हिडीओ पाहिलेत का?

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचं मन जिंकलं. मालिकेमधील कलाकारसुद्धा लोकप्रिय आहेत. या मालिकेत गेल्या बारा वर्षांपासून काम करणारी अभिनेत्री सोनालिका जोशी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोनालिका मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे यांच्या पत्नीची म्हणजेच माधवी भाभीची भूमिका साकारताना दिसते. आता तिने खऱ्या आयुष्यातील पतीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ करत असतानाही प्रियदर्शनीकडे मुंबईमध्ये राहण्यासाठी नव्हतं हक्काचं घर, म्हणाली, “वनिता खरातने तेव्हा…”

काही दिवसांपूर्वी सोनालिकाने तिच्या साखरपुड्यामधील एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती तिच्या नवऱ्यासह अगदी खूश दिसत आहे. साखरपुडा वाढदिवसानिमित्त तिने हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटलं होतं की, “या दिवशी आमचा साखरपुडा झाला. आम्ही दोघं नेहमीच एकत्र असणार आणि देवाचा आमच्यावर आशिर्वादही आहे”.

या व्हिडीओवरुन सोनालिकाचा साखपुडा अगदी साध्य पद्धतीने झाला होता असं दिसून येत आहे. सोनालिकाच्या लग्नाला आता २१ ते २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. याआधीही तिने तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहूनही तिने लग्नसुद्ध अगदी साध्या पद्धतीने केलं असल्याचं दिसून आलं. ती आपल्या पतीसह विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते.

आणखी वाचा – “फक्त बघून मोकळं व्हायचं” ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्याची तक्रार, समीर चौघुलेंनी चक्क माफी मागितली अन्…

‘तारक मेहता..’च्या पहिल्या भागापासून सोनालिका जोशी या मालिकेत माधवी भाभीचे पात्र साकारत आहे. मालिकेसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सोनालिकाचंही नाव आहे. सोनालिकाचा जन्म ५ जून १९७६ रोजी महाराष्ट्रात झाला. मराठी नाटकांपासून सोनालिकाने तिच्या करिअरची सुरुवात केली. याशिवाय सोनालिकाने मराठी चित्रपट आणि काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 15:21 IST

संबंधित बातम्या