छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ओळखले जाते. सध्या हा कार्यक्रम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. या मालिकेत मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता याच मालिकेत ‘बावरी’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका भदोरियाने शोचे निर्माते आणि कार्यकारी निर्मात्यांविरोधात पुन्हा आवाज उठवला आहे.

हेही वाचा- “तुझा बॉयफ्रेंड कोण आहे?” अखेर सारा अली खानने दिलं उत्तर, म्हणाली…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान मोनिकाने सेटवर दिल्या जाणाऱ्या त्रासाचा खुलासा केला आहे. मोनिका म्हणाली की, “मला अनेक कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागला आहे. मी खूप कमी कालावधीत माझी आई आणि आजी या दोघींना गमावले. ते दोघे माझ्या आयुष्याचे आधारस्तंभ होते. त्यांनी मला खूप प्रेमाने वाढवले. या दु:खातून ती कधीच बाहेर पडू शकली नाही. हा मोठा धक्का अनुभवल्यावर मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटले.

हेही वाचा- “वडिलांवर उचलला हात, मृत्यूसाठी केली प्रार्थना …” ‘रोडीज’मध्ये तरुणीने केला धक्कादायक खुलासा, गॅंग लीडर्स झाले निशब्द…

मोनिका पुढे म्हणाली, “त्या काळात मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी काम करत होते. मात्र, तिथेही माझा मानसिक छळ होत होता. घरची बिकट अवस्था आणि त्यात शोमध्ये होणार्‍या छळामुळे मी मानसिकरीत्या कोसळले होते. या गोष्टीमुळे मला आत्महत्या करावीशी वाटत होती.” असा खळबळजनक खुलासा मोनिकाने केला आहे.

मोनिकाअगोदर ‘तारक मेहता…’मधील अनेक कलाकारांनी मालिकेचे निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. जेनिफर मिस्त्रीने सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

Story img Loader