Jheel Mehta Shared A Video : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये सोनालिका भिडे उर्फ सोनूची भूमिका साकारून झील मेहता घराघरात पोहोचली. काही वर्षांपूर्वी तिने ही मालिका सोडली, पण आजही तिला यामधील सोनू म्हणूनच ओळखलं जातं. अशातच आता सोनू पुन्हा चर्चेत आली आहे.

सोनू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते. झीलने तिने २८ डिसेंबर २०२४ रोजी तिचा बॉयफ्रेंड आदित्य दुबे याच्याशी लग्न केलं. आता झील मेहता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नवरा आदित्यबरोबरचा एक व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

झील मेहताने दिली गुड न्यूज

झील मेहताने नुकतच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो पाहून चाहत्यांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा नवरा आदित्यसुद्धा आहे.आदित्यने झीलच्या पोटावर हात ठेवलेला दिसतो, त्यामुळेच खरंतर तिच्या चाहत्यांमध्ये तिने व्हिडीओ शेअर केल्यानंतर संभ्रम निर्माण झाला. या व्हिडीओच्या कॅप्शनमधून तिने आमच्याकडे शेअर करण्यासाठी काहीतरी खास आहे. असं म्हटलं आहे. हे वाचून अनेक चाहत्यांना वाटलं की झील प्रेग्नंट आहे. मात्र, प्रत्यक्षात ती गरोदर नसून तिने व तिच्या नवऱ्याने तिच्या चाहत्यांसह एक वेगळीच आनंदाची बातमी शेअर केली आहे.

पतीबरोबर नव्या घरात शिफ्ट झाली झील मेहता

झील आणि आदित्यने पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं की ते दोघे त्यांच्या नव्या घरात शिफ्ट झाले आहेत. त्यांनी त्यांच्या नव्या घराची चावीही दाखवली. आदित्यने झीलच्या पोटावरून हात काढताच त्या ठिकाणी घराची चावी दिसते. यानंतर झील आदित्यबरोबर आनंदाने नाचताना दिसते.

झीलने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “आमच्या आयुष्यातील एक छोटीशी अपडेट… तुम्हाला काय वाटलं होतं हे काय आहे?” यावर एका चाहत्याने लिहिलं, “मला वाटलं तू प्रेग्नंट आहेस.” तर दुसऱ्याने लिहिलं, “अभिनंदन सोनू.” आणखी एका युजरने लिहिलं, “एका क्षणासाठी खरंच वाटलं होतं. छान ट्विस्ट दिलात!” अशा कमेंट्स केल्या आहेत.