टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या काही मालिका या प्रेक्षकांच्या लाडक्या असतात. अशा मालिकांपैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही विनोदी मालिका आहे. ही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांचा चाहतावर्ग मोठा असल्याचे दिसते. आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणारी झील मेहता (Jheel Mehta) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

गोव्यातील बॅचरल पार्टीमधील फोटो केले शेअर

अभिनेत्री झील मेहताने इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर तिच्या गोव्यातील बॅचरल पार्टीमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने, “मुलींना मजा करायची आहे,” अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या पोस्टवर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील तिची सहकलाकार जेनिफर मिस्त्री बन्सीवालने, “अभिनंदन झीलो, कशी आहेस?” अशी कमेंट केली आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka
Bigg Boss Marathi : “बाप काढायचा नाही…”, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला मोठी शिक्षा! रितेश संतापून म्हणाला, “इथून पुढे…”
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
sai tamhankar talk about first time of bigg boss marathi season 5
सई ताम्हणकरला आवडला ‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ सदस्याचा स्वभाव, निक्की तांबोळीचा उल्लेख करत म्हणाली…
genelia deshmukh shares video of ganpati festival as family celebrates together
Video : देशमुखांच्या घरचा बाप्पा! संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं अन् मुलांनी केली आरती; जिनिलीयाने दाखवली खास झलक, पाहा व्हिडीओ
Sangram Chaugule And Nikki Tamboli
Video : संग्राम चौगुलेने निवडलेत ‘हे’ टॉप पाच स्पर्धक; निक्कीच्या गेमची केली पोलखोल, म्हणाला, “कोणी वंदा, कोणी निंदा; कॅमेऱ्यासमोर…”
Krushna Abhishek Kashmera Shah
कृष्णा अभिषेकच्या वडिलांनी ‘या’ कारणाने कधीच सूनेला स्वीकारलं नाही; कश्मीरा म्हणाली, “मी हॉट, सेक्सी होते अन्…”
झील मेहता इन्स्टाग्राम

जानेवारीमध्ये झीलचा बॉयफ्रेंड आदित्य दुबेने तिला प्रपोज केले होते. फेब्रुवारीमध्ये या जोडप्याने कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. मे महिन्यात झीलने सोशल मीडियावर आदित्यला प्रपोज केलेला एक व्हिडीओ शेअर करीत लिहिले होते, “प्रत्येक टेबलवर मी तुझ्यासाठी जागा ठेवते. मला माहीत आहे, तू हो म्हणशील (त्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही); पण तरीही मला फुलपाखरे जाणवत होती.”

झील अनेकदा आदित्यबरोबरचे फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर करीत असते. या जोडीने अद्याप ते लग्न नक्की कोणत्या महिन्यात करणार असल्याचे ते सांगितलेले नाही. मात्र, या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा २०२५ च्या सुरुवातीला ते लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

झील मेहता इन्स्टाग्राम

दरम्यान, झील मेहताने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत बालकलाकार म्हणून काम केले आहे. सोनू भिडेच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली होती. २०१२ मध्ये तिने हा शो सोडला. झीलशिवाय राज अनाडकत आणि भव्या गांधी या बालकलाकारांनीदेखील मालिका सोडली आहे. काही दिवसांपूर्वीच गोलीची भूमिका साकारणाऱ्या कुश मेहतानेदेखील उच्च शिक्षणासाठी तो परदेशात जाणार असल्याने ही मालिका सोडली आहे.

हेही वाचा: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! टीव्हीवर एकदाही न दाखवलेला रितेश-जिनिलीयाचा चित्रपट तब्बल २१ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार

विनोदी कथानकामुळे या मालिकेचे प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान आहे. २००८ पासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे.