TMKOC fame actress Palak Sindhwani: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत अनेक कलाकार काम करतात. गेल्या काही वर्षांत काही लोकप्रिय कलाकारांनी विविध कारणांमुळे मालिका सोडली. मालिका सोडल्यानंतर काहींनी मालिकेच्या निर्मात्यांवर मोठे आरोप केले होते.

असित मोदींनी तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेची निर्मिती केली आहे. २००८ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. हा शो आजपर्यंत प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करीत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशा सर्व पिढ्यांतील चाहतावर्ग या मालिकेला लाभला आहे.

असित मोदी विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी काही महिला कलाकारांना त्रास दिल्याचे, काही कलाकारांनी त्यांच्यामुळे, तर काहींनी मानधनामुळे मालिका सोडल्याच्या चर्चा सातत्याने होताना दिसतात.

Award Banner

मालिकेत सोनू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीनेदेखील गेल्या वर्षी मालिका सोडली होती. त्यानंतर तिने निर्मात्यांवर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता. याच कारणामुळे तिने मालिका सोडल्याचेदेखील वक्तव्य केले होते.

“आम्ही तिला…”,

आता असित मोदींच्या नीला फिल्म प्रॉडक्शन हाऊसने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी असे लिहिले, “नील प्रॉडक्शन हे जाहीर करू इच्छिते की, पलक सिंधवानी आणि कंपनीमधील वाद सौहार्दपूर्ण पद्धतीनं सोडवण्यात आला आहे. आम्ही तिला शुभेच्छा देतो.”

पुढे त्यांनी लिहिले, “इतक्या वर्षांत नीला फिल्म प्रॉडक्शननं अनेक टॅलेंडेट कलाकारांना समोर आणलं आहे. त्यांना त्यांची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे त्यांना मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये यशस्वी कारकि‍र्दीसाठी मदत झाली आहे. गेल्या काही वर्षांत या शोमधील पात्रं लोकप्रिय ठरली आहेत. संपूर्ण देशात हा शो प्रचंड गाजला आहे. प्रत्येक घरात या शोचं वेगळं स्थान आहे.”

ते या निवेदनात असेही म्हणाले, “आम्ही निष्पक्ष, पारदर्शक वातावरण निर्माण करण्यावरदेखील विश्वास ठेवतो. त्यामुळे प्रत्येक कलाकार आणि टीममधील सदस्याला आदर, सन्मान वाटेल.”

याआधीही काही अभिनेत्रींनी असित मोदींवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. काही अभिनेत्रींनी त्यांचे मानधन न मिळाल्याची तक्रार केली आहे.

दरम्यान, पलक सिंधवानीने शो सोडून जवळजवळ एक वर्ष झाले आहे. एक वर्षानंतर नीला फिल्म्स प्रॉडक्शनने अधिकृत निवेदन जारी केले आहे.