TMKOC Bagha meets Smriti Irani: तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करीत आहे. या मालिकेतील दया, जेठा, बापूजी, तारक मेहता, अय्यर, पोपटलाल, भिडे मास्तर, माधवीभाभी, बागा ही आणि इतर सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील प्रत्येक पात्राचे वेगळेपण आहे. त्यामुळे दया हे पात्र साकारणाऱ्या दिशा वाकानीने मालिका सोडल्यानंतर आजही ती मालिकेत परत यावी याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. या मालिकेतील कलाकार त्यांच्या भूमिकांमुळे सतत चर्चेत असतातच. त्याबरोबरच ते त्यांच्या मुलाखतीतील वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतात. त्यांची वक्तव्ये व सोशल मीडियावरील पोस्ट सतत चर्चेत येतात.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेता स्मृती ईराणींबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…

आता मालिकेत बागा ही भूमिका साकारणाऱ्या तन्मय वेकारियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तन्मयची पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे १७ वर्षांनी तो एका अभिनेत्रीला भेटला आणि या अभिनेत्री म्हणजे स्मृती इराणी.

स्मृती इराणी व तन्मय यांनी मनीबेन डॉट कॉम या शोमध्ये एकत्र काम केले होते. तन्मयने यामध्ये छोट्या भावाची भूमिका साकारली होती. आता १७ वर्षांनंतर ते एकमेकांना भेटले. त्याबरोबरच किरण भट्ट यांनी काही नाटकांची निर्मिती केली होती. त्यामध्ये स्मृती इराणींनी काम केले होते. अभिनेत्याने लिहिले, “जवळजवळ दीड दशकानंतर स्मृती इराणींना भेटून आनंद झाला.”

अभिनेत्याच्या या पोस्टवर स्मृती इराणींनी कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले की, तन्मय, तू खूप पुढे आला आहेस. तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा!

त्याबरोबरच अनेक चाहत्यांनीदेखील कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “बागाभाई, नट्टूकाका, तुलसी.” दुसऱ्या एकाने लिहिले, “वाह.” आणखी एकाने लिहिले, “क्यूट”. एकाने लिहिले, “माझ्या आवडत्या स्मृती इराणीमॅडम”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

स्मृती इराणी सध्या स्टार प्लसवरील क्योंकि साँस भी कभी बहू थी या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही मालिका २९ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका १७ वर्षांनंतरही विविध ट्विस्ट, विनोद आणि प्रत्येक वयोगटातील पिढीला आपलीशी करणारी गोष्ट यांमुळे आजही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत टिकून आहे.