scorecardresearch

“तुम्हाला मानधन मिळेल पण…” ‘तारक मेहता…’ शैलेश लोढांच्या आरोपांवर मालिकेच्या टीमने दिले स्पष्टीकरण

“आजवर एकाही कलाकारामुळे प्रॉडक्शन हाऊस थांबलेले नाही.”

shailesh lodha
शैलेश लोढा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली. काही महिन्यांपूर्वी या मालिकेतीले अभिनेते शैलेश लोढा यांनीही या मालिकेला रामराम केला. शैलेश लोढा यांनी शोच्या निर्मात्यांवर थकबाकीचा आरोप केला होता. त्यावर आता मालिकेच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहतांची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर शैलेश लोढा यांना मानधन न मिळाल्याने त्यांनी ही मालिका सोडली, असे बोललं जात आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, शैलेश लोढा यांना वर्षभरापासून पैसे दिलेले नाहीत. याबद्दल मालिकेच्या निर्मात्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे एप्रिल २०२२ मध्ये मालिका सोडली. पण आता या संपूर्ण प्रकरणावर निर्मात्यांनी भाष्य केले आहे.

या मालिकेच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, “शैलश यांना पैशासाठी सतत संपर्क केले जात होते. पण ते कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि उर्वरित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आलेलेच नाही. प्रत्येक कंपनीची एक प्रणाली असते. त्याच्याशी संबंधित लोकांनी तिचे पालन करणे अपेक्षित असते. आजवर एकाही कलाकारामुळे प्रॉडक्शन हाऊस थांबलेले नाही. शैलेश लोढा यांनाही त्यांची थकबाकी मिळेल, पण त्यासाठी त्यांना येऊन कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल.

त्याबरोबर या मालिकेचे प्रोजेक्ट हेड सुहेल रमण यांनी ई-टाईम्सशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही त्यांना वारंवार कागदपत्रांवर स्वाक्षरी करा आणि पैसे घेऊन जा, असं सांगत होतो. पण त्यांनी तसे केले नाही. जेव्हा तुम्ही एखादी कंपनी किंवा मालिका सोडता तेव्हा त्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते ज्याचे पालन करणे आणि त्याची पूर्तता करणे आवश्यक असते. प्रत्येक कलाकार, कर्मचारी आणि तंत्रज्ञ यांना या औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. औपचारिकता पूर्ण करण्याआधी कोणतीही कंपनी तुम्हाला पैसे देत नाही.”

शैलेश लोढा हे गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा काम करत होते. यात त्यांनी तारक मेहताची भूमिका साकारली होती. पण २०२२ मध्ये त्यांनी अचानक ही मालिका सोडली. शैलेश लोढा मालिकेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ तारक मेहता भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 13:05 IST
ताज्या बातम्या