‘तारक मेहका का उल्टा चष्मा’ मालिकेचे आजही लाखो चाहते आहेत. या मालिकेमध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने कार्यक्रमामधून एक्झिट घेतली. तरीही ती अजूनही दयाबेन या भूमिकेमुळे चर्चेत असते. आता एका वेगळ्याच कारणामुळे दिशा चर्चेत आली आहे. दिशाला घशाचा कर्करोग झाला असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागली आहे. पण यामध्ये कितपत तथ्य आहे याबाबत अभिनेते दिलीप जोशी, निर्माते असित मोदी यांनी खुलासा केला आहे.

काय म्हणाले दिलीप जोशी?
दिशाला घशाचा कर्करोग झाला असल्याची बरीच चर्चा रंगत आहे. पण खरंच तिला या आजाराचा सामना करावा लागत आहे का? याबाबत ‘आजतक’ने दिलीप जोशी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले “सकाळपासून दिशा वकानीला खरंच घशाचा कर्करोग झाला आहे का? याबाबत अनेक फोन येत आहेत. अनेक बातम्या माझ्या कानावर आल्या आहेत. मी फक्त एवढंच सांगेन की या सगळ्या अफवा आहेत. याकडे लक्ष देऊ नका.”

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा

दिलीप जोशी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर याबाबत ‘तारक मेहका का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सोशल मीडियावर लाइक मिळवण्यासाठी अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. आवाज काढल्यामुळे नव्हे तर तंबाखू सेवनाने कर्करोग होतो. तसं पाहायला गेलं तर कित्येक लोक मिमिक्री करतात.”

आणखी वाचा – Video : लेकाने दिलेलं ‘ते’ वचन, घट्ट मिठी मारली अन्…; अमिताभ बच्चन मंचावरच रडू लागले, भावुक व्हिडीओ एकदा पाहाच

तसेच काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिशाने याबाबत भाष्य केलं होतं. “मला कधीच घशाच्या कर्करोगाचा सामना करावा लागला नाही. माझ्या आवाजाला आजपर्यंत कोणतं नुकसान पोहोचलं नाही.” असं दिशाने म्हटलं होतं. त्यामुळे दिशाला कर्करोग झाला असल्याचं वृत्त खोटं असल्याचं आता समोर आलं आहे.