Tanvi Kolte Dance Video: सोशल मीडियावर एखाद्या गाण्यावरील डान्स स्टेप्स ट्रेंड होतात, काही वेळा डायलॉग ट्रेंड होतात, तर काही वेळा काही गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. संजू राठोडची अनेक गाणी व्हायरल झाली आहेत. यामध्ये सुंदरी, गुलाबी साडी या गाण्यांचा समावेश आहे. ही गाणी इतकी व्हायरल झाली की फक्त महाराष्ट्रातील लोकच नाहीत संपूर्ण भारतातील लोक यावर थिरकले. सोशल मीडियावर या गाण्यावरील अनेक रील व्हायरल झाल्या. या गाण्यांमुळे संजू राठोडला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. आता काही दिवसांपूर्वीच त्याचे गाणे आणखी एक प्रेक्षकांच्या भेटीला आले.
लाल लाल कलरची बांगडी असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले. सामान्यांसह अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील्स शेअर केल्या आहेत. त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तन्वी कोलतेचा ‘लाल लाल कलरची बांगडी…’ गाण्यावर डान्स
आता अभिनेत्री तन्वी कोलतेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने संजू राठोडच्या लाल लाल कलरची बांगडी या गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना तिने, “चाल माझ्या सोबत चाल”, अशी कॅप्शन दिली आहे. तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच, मोजकेच दागिने घातले आहेत.
नेटकऱ्यांनी लिहिले…
तन्वीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “खूप सुंदर”, दुसऱ्याने लिहिले, “कमाल”, एकाने लिहिले, “तन्वी, माझी आवडती स्पर्धक”, एकाने लिहिले, “एक नंबर”, आणखी एकाने लिहिले, “तन्वीला हे गाणं सूट होतं”, एकाने लिहिले, “क्यूट स्माईल आणि हावभाव”, आणखी एकाने लिहिले, “पण, लाल बांगड्या कुठे आहेत?”, एकाने लिहिले, “किती गोड”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी खूप छान म्हणत हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.




तन्वी कोलते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत होती. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. पहिल्या दिवसापासूनच तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बिग बॉसने दिलेल्या प्रत्येक टास्कमध्ये ती उत्तम खेळली. तिने प्रेक्षकांची मने जिंकली. ती सहाव्या पर्वाची विजेती ठरली.
तन्वीला त्याआधी लक्ष्मी निवास या मालिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. तिने सिंचना ही भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तिला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.
आता लक्ष्मी निवास, बिग बॉस मराठी यानंतर तन्वी कोलते कोणत्या प्रोजेक्टमधून, कोणत्या भूमिकेतून किंवा कोणत्या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
