Tanvi Kolte on entry in Hindi Bigg Boss: एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणं, तिथे स्वत:ला इतर स्पर्धकांच्या बरोबरीने खेळात स्वत:ला सिद्ध करणं, स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणं यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. खतरों के खिलाडी, बिग बॉस, रोडीज अशा विविध रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.

नुकताच बिग बॉस मराठीचे सहावे पर्व संपले. या पर्वाची विजेती अभिनेत्री तन्वी कोलते ठरली. ती जिंकल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता तन्वीने विविध मुलाखतींमधून तिच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल सांगितले. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांबद्दल तिने वक्तव्य केले आहे. याबरोबरच, आता हिंदी बिग बॉसमध्ये जाणार का, यावही तिने वक्तव्य केले.

“ऑफर आली तर मी…”

तन्वी कोलतेने नुकतीच ‘नवशक्ती’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, मराठी बिग बॉस तर झालं, पण हिंदी बिग बॉसमध्ये तू जाणार आहेस का? यावर तन्वी कोलते म्हणाली, “नक्कीच. ऑफर आली तर मी नक्की जाईन. तिथे सुद्धा मी माझे १०० टक्के प्रयत्न करेन. मला खेळायला आवडेल.”

तन्वीने हिंदी बिग बॉसमध्ये जावं, असे राखी म्हणाली होती. तर तिला तू काय सांगशील? यावर तन्वी कोलते म्हणाली, “राखीचीच इच्छा आहे की मी हिंदी बिग बॉसमध्ये जावं. ती आल्यापासून तेच म्हणत आहे की तू हिंदी बिग बॉस मटेरिअल आहेस. तू तिथे सुद्धा छान खेळशील.”

हिंदी बिग बॉसमध्ये तन्वी कोलते २.० पाहायला मिळणार आहे का? यावर तन्वी कोलते म्हणाली, “२.० असं नाही. आतमध्ये गेले होते, तेव्हा तन्वी कोलते म्हणून गेले होते. आता तन्वी कोलते ब्रँड म्हणून आली आहे. तो ब्रँड माझ्या जनतेने मोठा केला आहे. जनतेने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि ती मला पार पाडायची आहे. ज्या प्रकारे जनतेने प्रेम दिलंय, त्या प्रकारे जनता पुढेही प्रेम देत राहील. त्यांच्या प्रेमाला मी खरी उतरेन. त्यांनी मला जी जबाबदारी दिली आहे, ती ढासळू न देता पार पाडेन, असे मला वाटते.”

तन्वी कोलतेने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती वेळोवेळी बोलली, तिने उत्तम पद्धतीने टास्कही खेळले. तिला टास्क क्वीन असेही म्हटले गेले. राकेश बापट, दिपाली सय्यद,रेवा कौरसे, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांच्या काटा ग्रुपची चांगलीच चर्चा झाली. त्यांच्या मैत्रीचे सर्वत्र कौतुक झाले.

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी होण्याआधी तन्वी लक्ष्मी निवास या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने सिंचना ही भूमिका साकारली होती. तिला या भूमिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.

दरम्यान, आता बिग बॉस मराठीची विजेती ठरल्यानंतर तन्वी कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.